फेब्रुवारी संपला, लाडकी बहिणींना हप्ता कधी मिळणार मार्च महिना सुरु झाला मात्र राज्याच्या तिजोरीचे गणित बिघडलेले

महायुती सरकारने विधानसभा निवडणूकी पुर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली. महायुती सरकारने सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे म्हटल्याने ही योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरली. मात्र आता सरकारला ह्प्ता देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसते. फेब्रूवारी संपला तरी हप्ता अंद्याप मिळाला नाही त्यामुळे फेब्रूवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का याची वाट पहावी लागणार आहे.

विधानसभा निवडणूकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली. ही योजना महायुती सरकारला फारच लाभदायी ठरली. त्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला. असं बोललं जात असलं तरी निवडणूकीत सरकारच्या मदतीला ईव्हीएम मशीन चांगलेच उपयोगी आले असे राजकीय तज्ञांचे मत आहे. निवडणुकीनंतर या योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना पैसे दिले जाण्याचे सरकारने म्हटलं होतं मात्र सरसकट लाभ देण्या ऐवजी सरकारने आता लाभार्थ्यांचे निकष ठरविले आहेत. त्यासाठी ईकेवायसी प्रक्रिया सुद्धा अनिवार्य करण्यात आली.

या योजनेचा फायदा जास्त प्रमाणात ग्रामीण भागातील महिलांना होत असून त्यातही ई-केवायसी करताना अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर सरकारने ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्यास मार्च महिन्यापर्यंत मुदत दिली. त्यामुळे ईकेवायसीमध्ये चुकू झाली असल्यास एक दुरुस्तीची संधी लाडक्या बहिणीला मिळाली आहे. या योजनेचा लाभ वेळेवर तर मिळत नाही याचे कारण इतर खात्याच्या निधीचा पैसा या योजनेकडे वळविला जातो त्यामुळे त्या त्या खात्याच्या विकासावर परिणाम होतो हे विधीमंडळात एका वरिष्ठ मंत्र्यांनीच सांगितल्याने योजना बंद होईल का अशी शंका निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीचा हप्ता १५०० रुपयांवरुन २१००  रुपये करण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र, अद्याप हप्त्याच्या रकमेत वाढ करण्यात आलेली नाही. उलट लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपयांचा हप्ता दिला जातो. या हप्त्यासाठी राज्य सरकार अन्य खात्याचा निधी वळवून त्याची पूर्तता करत आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून हप्ता वेळेवर मिळत नाही. तसेच सरसकट सर्व महिलांना लाभ देण्याच्या ऐवजी योजनेची ईकेवायसी करुन अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर करण्यात येत आहे. पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचा हप्ता दिला जातो. पण गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरिस लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला. पण आता मार्च महिना उजाडला आहे तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यातच मंत्री गणेश नाईक यांनी या योजनेमुळे इतर खात्यांवर भार पडत असल्याचं म्हटलं. आधी विरोधक याबाबत विविध दावे करत होते. पण आता सरकारमधील मंत्र्यानेच विधान केले आहे. त्यामुळे योजना बंद तर होणार नाही ना? असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होऊ लागला.

फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये सरकारकडून लाडक्या बहिणींना दिले जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. ही लाडक्या बहिणींसाठी एक खास भेट ठरू शकते. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

About Editor

Check Also

रमेश चेन्नीथला यांचे आवाहन, भाजपाचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील स्मारकाची भाजपा सरकारच्या करंटेपणामुळे दुरवस्था-हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *