Breaking News

Tag Archives: भाजपा

‘लाडकी बहीण’ विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची याचिका भाजपाची टीका काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा उघड झाल्याचा केशव उपाध्ये यांची टीका

लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजने विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी, लाडकी बहिण …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या

तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात घडली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टीका केली आहे. राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया …

Read More »

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणः राणे समर्थक-ठाकरे समर्थक भिडले नारायण राणे, निलेश राणे आणि ठाकरे समर्थक आमने सामने

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विजयदुर्ग किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालवणच्या समुद्र किनारी उभारण्यात आला. मात्र मागील आठवड्यात हा पुतळा अचानक कोसळून पडला. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा गटाचे …

Read More »

नितीशकुमार-भाजपाच्या राजवटीत अशीही शिक्षा तेजस्वी यादव कडून व्हिडीओ ट्विट तरूणाच्या गुदद्वारात मिर्ची फूड टाकतानाचा भयावह व्हिडिओ

बिहारमधील अररियामध्ये एका व्यक्तीला दोरीने बांधून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिर्ची पावडर भरण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ, आता व्हायरल होत असून, त्या व्यक्तीचे हात पाठीमागे बांधलेले दिसत आहेत. त्याची अर्धी चड्डी काढलेली आहे आणि गुडघ्यापर्यंत खाली ओढण्यात आली आहे, तर अन्य एका साथीदाने संबधित तरूणाचे हात पकडून खाली वाकवल्याचे दिसून …

Read More »

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अखेर आशिष शेलार यांची सरकारच्यावतीने माफी सर्वचस्थरातून टीकेचा भडीमार सुरु झाल्यानंतर अखेर माफीनामा

मालवण येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाचे औचित्य साधत करण्यात आले. त्यास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही तोच पुतळा कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झो़ड उठली. विरोधकांबरोबरच अनेक शिवप्रेमी आणि विविधस्तरांतूनही टीकेची झोड …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा निर्धार, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही राज्यात मशाल आगामी विधानसभा निवडणुकीत पेटवायची

‘पुढील ५० वर्ष ठरवरणी ही निवडणुक आहे . महायुतीवाले शिवसेना व जनतेला घाबरले आहे. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि या पैठणला मद्यपान केलेल्या लोकप्रतिनिधीवरील राग मतदानातून प्रकट करा असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बिकट निवडणुक आगामी विधानसभा आहे. राज्यातीस आगामी विधानसभेत …

Read More »

कंगनाच्या बेताल शेतकरी विरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध अखिल भारतीय किसान सभेचे अजित नवलेंकडून पत्रक

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाले. हे आंदोलन चीनने घडवून आणले होते व या आंदोलनाच्या आडून देशात बांग्लादेश घडवण्याचे षड्यंत्र होते अशा प्रकारचे अत्यंत बेताल वक्तव्य कंगना राणावतने केले. कंगणा राणावतच्या या वक्तव्याचा निषेध अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी कॉ अजित नवले यांनी …

Read More »

पेन्शन योजनेवरून मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, यु म्हणजे मोदींचा युटर्न नव्या युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेवरून सोडले टीकास्त्र

केंद्र सरकारने काल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना जाहिर केली. या योजनेवरून काँग्रेसने टीकेची झोड उठविली. युपीएस मधील यु म्हणजे मोदी सरकारचा यु टर्न असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली. केंद्र सरकाच्या काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या सरकारी …

Read More »

संजय राऊत यांची टीका, मोडतो़ड तांब्या-पितळ सारखी आमची आघाडी नाही महाविकास आघाडीत जागा वाटपांवर ९९ टक्के सहमती

महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून या जागा वाटपाबाबत ९९ टक्के सहमती झाली आहे.  मुंबईतील जागांबाबतही प्राथमिक स्तरावर कालच्या बैठकीत चर्चा झाली असून तसेच पुढेचा मुख्यमंत्री कोण असावा यावरूनही आमच्यात वाद नाही की जागा वाटपांबाबतही वाद नसल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याशी काँग्रेस, उबाठा सहमत आहे का? काश्मीरसाठी स्वतंत्र झेंडा, ३७० वे कलम पुन्हा लागू करू

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी वेगळा झेंडा निर्माण करू, ३७०, ३५ (अ) कलम पुन्हा लागू करू आदी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांशी काँग्रेस, उबाठा सहमत आहेत का असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश …

Read More »