Breaking News

Tag Archives: भाजपा

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री- दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार उपमुख्यमंत्र्यानी राजीनामे द्यावे

राज्यातील सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा आंदोलक …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, एकनाथ शिंदे, अजित पवार प्रकरण ३१ डिसेंबर जानेवारी पर्यंत संपवा सरन्यायाधीश डि.वाय चंद्रचूड यांनी दिला शेवटचा अल्टीमेटम

महाराष्ट्रातील शिवसेना फुटीप्रकरणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाचे प्रकरण ३१ डिसेंबरपर्यंत संपवा. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वादाचे प्रकरण ३१ जानेवारी २०२४ पर्यंत संपवा असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, राज्य- केंद्राने लवकर निर्णयाची आवश्यता, पण आता… विलासराव देशमुख यांचे मित्र विनायकराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

लातूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते तथा पूर्वाश्रमीचे स्व.विलासराव देशमुख यांचे घनिष्ट मित्र विनायकराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज देशाच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न या आरक्षणाच्या प्रश्न आधी देखील चर्चा झालेली आहे. मी स्वतः जरांगे पाटलांची …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, बोलायला येत तोपर्यंतच या… फडणवीस यांनी कानात बोळे घातले होते का

मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी विना औषध उपचार आणि पाणी न घेता उपोषणाला सुरुवात केली. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशीच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळायला सुरुवात झाली असून आता जरांगे पाटील यांना फार …

Read More »

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर राज्य सरकार थोडेसे नरमले सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक

मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीच्या घोषणा देत २९ नोव्हेंबरपासून गावागावात सामूहिक आमरण उपोषणाचे आवाहन केले. तसेच या आमरण उपोषणाच्या कालावधीत कोणाला काही झाले तर त्याची जबाबदारी सरकारवर राहणार असल्याचा इशारा दिला. तसेच आगामी काळात आणखी आंदोलन तीव्र करणार असल्याचे अंतिम इशारा दिला. त्यानंतर …

Read More »

पीक विमा योजनेवरून नाना पटोले यांची टीका, तर मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी फडणवीस व भाजपा जनतेच्या मनातूनच डिलीट झाले, त्यांना पुन्हा संधी नाही

राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात दुष्काळी …

Read More »

उद्धव ठाकरे यांनी विचारला मोदींना जाब, …अजित पवारांच्या ७० हजार कोटींबद्दल सांगा शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केले

शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता, कृषीमंत्री म्हणून काय केले? असा हल्लाबोल केला होता. याला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे पलटवार करीत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण मंचावर कोणीतरी बसले होते. असे म्हणत त्यांनी …

Read More »

आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, आरेचे जंगल कागदावर… माहुलच्या प्रदुषण करणा-या कंपन्यांचा १४ हजार कोटींचा दंड उबाठाकडून माफ

तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर आरेला जंगल म्हणून घोषित केले आणि प्रत्यक्षात मुंबईत काय “करुन दाखवले?” तर मुंबईत बिल्डरांना ‍प्रिमियमची खैरात करुन सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे करुन दाखवले. त्याचे परिणाम आता मुंबईकरांना भोगावे लागत असल्याची टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज पुन्हा केली. मुंबईच्या …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला, … मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवतील मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बोलताना युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपासह राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले , राज्यातील मिंदे यांच्या नेतृत्वाखालील फडणवीस-पवार यांचे सरकार हे तोडून मोडून हे सरकार बनलं आहे. आम्हाला वाटलं हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल. मात्र या सरकारला आमच्यापेक्षा जास्त …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकरी आणि आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला… शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन …

Read More »