विद्यमान विधानसभेची मुदत संपत आली आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणूकीशी संबधित प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यानुसार आज मंत्रिमंडळाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा देत संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाचा आज राजीनामा दिला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीत सर्वात मोठा राजकिय पक्श ठरलेल्या भाजपा आणि महायुती कडून सरकार स्थापन करण्याचा दावा अद्याप करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.
वास्तविक पाशवी आणि संशयातित मतदानाच्या आधारे बहुमताचा दावा करणाऱ्या भाजपा आणि महायुतीने खरेच जर जनतेच्या मतदानावर बहुमत मिळवले असते तर महायुतीचा मुख्यमंत्री पदावर कोण राहणार याचा निर्णय आतापर्यंत महायुतीने घेतला असता. मात्र उमेदवारांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय केल्यानंतरही साधे किमान ५०-६० कार्यकर्त्ये किंवा सर्वसामान्य नागरिकांना आनंद व्यक्त करू नये यातच महायुतीच्या उमेदवारांना मतदान कोणी केले असेल याचा अंदाज बांधता येईल.
रंतु, राज्यातील जनतेचे लक्श विचलित करण्यासाठी म्हणून आता पुढील नवा मुख्यमंत्री कोण या चर्चा पुढे आणली जात आहे. त्याचबरोबर मागील सरकारने धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील शेकडो हेक्टर जमीन अदानीला देण्यात आलेली आहे. आता त्या जमिनीवर रहिवाशांना हटवून त्या ठिकाणी अदानीचे प्रकल्प उभारण्यास सुरुवात होत नाही तोपर्यंत अदानीला सरकारी संरक्शण पुरविण्याचे प्राथमिक काम या सरकारचे राहणार आहे. त्यामुळे सरकार नामक यंत्रणेचे काम अदानी सारख्यांच्या उद्योगपतींच्या इच्छेसाठी सरकार दिमतीला ठेेवण्याचे आणि त्याच्यावरून निर्माण होणाऱ्या असंतोषाचे खापर फोडायला आणि भाजपाच्या अजेंड्याला मम म्हणून मान्यता देणाऱ्या मुख्यमंत्री व्यक्तीची गरज सध्या भाजपाला आहे.
ापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी नियुक्ती केल्यास अशा भाजपाच्या मित्रांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करायची कि ७० हजार कोटी रूपयांचा आरोप केलेल्या अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवायचे या विचारात भाजपा आहे. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री कोण असणार या चर्चेला भाजपाने केंद्रस्थानी आणून ठेवले आहे.
Marathi e-Batmya