धुळ्यात पैसे वाटणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला वंचितने पकडत केले पोलिसांच्या हवाली पण पोलिसांचा भीमनगरभोवतीच बंदोबस्त वाढवला

धुळे शहरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. मात्र त्यानंतर पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी भीमनगर वस्तीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.

अशा प्रकारे वस्तीच्या प्रवेशद्वारावर इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आणि गाड्या लागल्या मुळे मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन करतो की त्यांनी तात्काळ या प्रकरणी लक्ष घालावं. निवडणुका या निर्भय वातावरणात पार पडल्या पाहिजेत. आणि ते वातावरण निर्भय ठेवण्याचं काम हे प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचं असतं.

त्यामुळे निवडणूक आयोगाने तात्काळ यात लक्ष घालून तिथे तैनात केलेले पोलीस काढून घ्यावेत आणि नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाला जाता येईल असे बघावे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *