डिलीमीटेश प्रश्नावरून तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी सांगितले की, सीमांकनामुळे दक्षिणेकडील राज्ये एकही संसदीय जागा गमावणार नाहीत. कोइम्बतूर, तिरुवन्नमलाई आणि रामनाथपुरम येथील पक्ष कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, “आज सीमांकनामुळे दक्षिणेकडील राज्यांना त्रास होऊ नये यासाठी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, ‘घाशीराम कोतवाल करो सो कायदा’ महाराष्ट्रात चालणार नाही पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली
राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच …
Read More »एम के स्टॅलिन यांचे टीकास्त्र, ही बैठक दक्षिणेतील राज्यांवर टांगत्या तलवारी सारखी परिसीमन करण्याची नवी प्रक्रिया जणगणनेनंतर सुरु गोणार
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मंगळवारी सीमांकनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ५ मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची घोषणा केली. स्टॅलिन पुढे बोलताना म्हणाले की, ही बैठक “दक्षिणेकडील राज्यांवर तलवारीसारखी टांगली जात आहे”. कुटुंब नियोजनाच्या उपाययोजनांमुळे तामिळनाडूला संसदीय जागांमध्ये संभाव्य घट होत असल्याचे सांगितल्यानंतर स्टॅलिन यांनी ही घोषणा केली. मतदारसंघांच्या सीमा …
Read More »मुख्यमंत्री फडणीस यांची ग्वाही, सीएसआर निधीच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या माध्यमातून समतोल विकास साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आदिवासी विकास विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) द्वारे सह्याद्री अतिथीगृह येथे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी १५ हजारांचा सन्मान निधी ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ३ हजार रुपये वाढविणार
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, ‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल राज्यात डिजीटल सेवांचे प्रमाण वाढले
तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच देशाच्या ‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हॉटेल ग्रॅंड हयात येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी …
Read More »दिल्लीत विद्यमान मुख्यमंत्री यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते पद आम आदमी पक्षाच्या आतिशी यांच्याकडे
आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी रविवारी माजी काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांची दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते (एलओपी) म्हणून निवड केली. राजधानीत पक्ष सत्तेतून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी, पक्षाचे आमदार आणि वरिष्ठ नेते दुपारी १ वाजता पक्ष कार्यालयात भेटले. शनिवारी, ‘आप’ने पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आणि त्यांच्या आघाडीच्या संघटनांच्या प्रभारींसोबत पहिली बैठक घेतली. निवडणुकीदरम्यान …
Read More »हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदे यांचा इशारा नेमका कोणासाठी फडणवीस की ठाकरे एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिलेल्या प्रकल्पांना स्थगिती आणि चौकशी
राज्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढत्या दरीच्या कथित चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना हलके न घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना टाळाटाळ करणारे एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाचा संदर्भ देत …
Read More »उच्च न्यायालयात मुंबई महापालिकेची माहिती, १४०० कोटींचे सफाई कंत्राट रद्द निविदा प्रक्रिया रद्द करण्याची महापालिकेवर नामुष्की
झोपडपट्ट्यांतील सफाईचे कंत्राट बेरोजगारांच्या संस्थेला देण्याचे राज्य शासनाचे धोरण असताना महापालिकेने मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेऐवजी अन्य संस्थांना कंत्राट देण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या निविदा प्रक्रियेवर मागील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर निविदा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. महापालिकेने हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे केली. यासंदर्भात आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही यावेळी …
Read More »
Marathi e-Batmya