ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला पळून गेलेला आरोपी ललित पाटील याला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील पोलिसांना शोध लागत नव्हता. अखेर ललित पाटील याला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुद्यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, ड्रग माफिया ललीत पाटील हे तर प्यादे, खरा मास्टरमाईंड कोण? महाराष्ट्रातील तरुणांचीपिढी अमली पदार्थांच्या व्यसनाने बरबाद करण्याचे येड्याच्या सरकारचे पाप
महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललीत पाटील हा एक प्यादा आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण? …
Read More »अतुल लोंढे यांची टोला, अमितभाई, देशातील पहिले एम्स नेहरुंनी १९५३ साली सुरु केले मोदी-शहांना खोटे बोलणे व जुमलेबाजीशिवाय काहीच येत नाही
भारतीय जनता पक्षाचे नेते खोटे बोलण्यात पटाईत आहे. भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी व अमित शहा धादांत खोटे बोलतात व तोंडावर आपटतात. छत्तिसगडमधील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात मोदी सरकारच्या आधी एकही एम्स नव्हते अशी थाप मारली पण अमित शहा यांना माहित नसावे की पहिले पंतप्रधान पंडित …
Read More »नाना पटोले यांची मागणी, मीरा बोरवणकरांच्या आरोपांची न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यमुक्त करा
माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची …
Read More »नाना पटोले यांचा सवाल,… मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले ‘दादा’ कोण? भाजपा आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल
राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही त्यांनी कोणत्याच समाजाला आरक्षण दिलेले नाही, त्यांनी या समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, मोदी…. नापास जागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तानपेक्षाही भारत खालच्या स्तरावर हे मोदींचे मोठे अपयश
जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार भारत आता पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्याही खाली घसरला आहे ही बाब आपल्यासाठी भूषणावह नाही. …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, टोलनाक्यांवर सरकारच्या कॅमेऱ्यासोबत मनसेचे कॅमेरे कशासाठी? सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही
राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे. विरोधी पक्षाने जनतेचा एखादा मुद्दा सरकारकडे मांडला तर त्यावर सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो कोणाच्या घरी मंत्री …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, निर्णय तात्काळ मागे घ्या, विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवा इतर मागास बहुजन कल्याण विभागाला जाहिरातीवर उधळपट्टीसाठी ३१ कोटी
राज्य सरकारने कंत्राटी पध्दतीने शिक्षक भरती व कमी पटसंख्येच्या शाळा बंद करुन समूह शाळा विकसित करण्याबाबतचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणणारा आहे. या निर्णयाला शिक्षण क्षेत्रात सर्व स्तरावरुन प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेऊन विद्यार्थ्यांचे धोक्यात येणारे भवितव्य वाचविण्याचा विचार शासनाने करावा, या निर्णयाला स्थगिती द्यावी, …
Read More »नाना पटोले यांची टीका, राज्यातील भाजपाप्रणित सरकार गुजरातच्या आऊट सोर्सिंगवर पोलिसांची कंत्राटी भरती करून तरुणांच्या भविष्याचा आणि सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका
राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने तरुणांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नावर पाणी फेरले असून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती सुरु करुन आरक्षणवरही घाव घातला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत घातक व सुरक्षेच्यादृष्टीने गंभीर आहे. राज्यातील भाजपाप्रणित सरकार गुजरातच्या आऊट सोर्सिंगवर चालत आहे पण पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करुन तरुणांसोबतच महाराष्ट्राच्या सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका, …
Read More »नाना पटोले, सुषमा अंधारे यांच्या मागणीला यशः ससूनप्रकरणी चौकशी समिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
ससून रूग्णालयात ललित पाटील भूषण पाटील या अंमली पदार्थ तस्करांना दाखल करून घ्यावे या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे मंत्री दादाजी भुसे यांनी रूग्णालय प्रशासनाला फोन केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. त्याननुसार या प्रकरणातील सत्य बाहेर …
Read More »
Marathi e-Batmya