Tag Archives: जयंत पाटील

जयंत पाटील यांची खंत, एखादा निर्णय माझ्या शेतकऱ्यांबाबत घेतला असता तर… राज्यभरात परतीच्या पावसाने शेतकरी संकटात ; कापूस, मका, सोयाबीन आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान

राज्यभरात परतीच्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेण्याचा धडाका लावला होता त्यात एखादा निर्णय माझ्या शेतकऱ्यांबाबत घेतला असता तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी आपल्या …

Read More »

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश मुस्लिम खाटीक समाज, उच्च न्यायालयातील वकील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखवित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेत पक्षात प्रवेश देण्याची मागणी केली होती. मात्र आता विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या डॉ ज्योती विनायक मेटे …

Read More »

शरद पवार यांच्या संकेताने महाविकास आघाडीत चलबिचल संजय राऊत म्हणाले… जयंत पाटील यांचे नाव घेताना खास विशेषणांचा उल्लेख

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. त्यात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार असल्याची अधिकृत घोषणा नसली तरी अप्रत्यक्ष घोषणा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना आव्हान देत तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहिर करा असे आव्हान …

Read More »

शरद पवार यांचा टोला, ४८ पैकी ३१ जिंकल्यावर यांना लाडकी बहिण आठवली संजीवराजे निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यापासून अजित पवार हे सातत्याने प्रत्येक जाहिरसभेत बोलताना माणसानं आता कुठेतरी थांबायला हवं, वय झालं पुढीच्या पिढीच्या हातात सगळं सोपवायला पाहिजे असे सांगत अप्रत्यक्ष शरद पवार यांना निवृत्तीचे वय झाल्याची आठवण करून देत असतात. आज साताऱ्यात रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव संजीवराजे निंबाळकर आणि …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारचे ९० कोटी रुपयांचे टेंडर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत मात्र त्याआधी सरकारतर्फे विविध निर्णय घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी ९० कोटीचे टेंडर काढले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती …

Read More »

शरद पवार म्हणाले, बोर्ड वाचला मलिदा गँग संपवा… जावई कुणाचा हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी शरद पवार यांचे सूचक विधान

माझा प्रयत्न होता की पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं. त्याच हेतून माझं लक्ष इंदापूरकडे होत. जाणून बुजून विचारपूर्वक इंदापूरच्या एका सहकार्याला प्रोत्साहन करण्याचं काम केलं, चेअरमन केलं, जिल्हा परिषदेचे प्रमुख केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले, मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा आग्रह केला. त्याच्यामध्ये हेतू होता …

Read More »

जयंत पाटील यांचा स्पष्टोक्ती, दिल्लीश्वरांनी जबरदस्ती केली तेव्हा पवारसाहेबांनी… इंदापूरचे हे महाधनुष्य हर्षवर्धन पाटील आपल्या पक्षात आल्यामुळे आपल्यासाठी सोपे झाले

आजच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहून इंदापूर विधानसभेचा निकाल काय लागणार हे आता जाहीर झालंय, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत महाराष्ट्र लढणाऱ्या माणसांच्या मागं उभा राहतो. दिल्लीश्वरांनी शरद पवार यांना मोडण्याचे प्रयत्न केला, ईडीची नोटीस पण पाठवली, पण पवार साहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवला असे …

Read More »

हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी, म्हणाले, सुप्रिया सुळे यांच्या विजयात अदृष्य हात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत केला प्रवेश जयंत पाटील यांच्याकडून सूचक विधान

कधी काळी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता मला रात्रीची झोप सुखाने लागते म्हणणारे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी आज जवळपास १० वर्षांनंतर भाजपा सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पक्षाची तुतारी हाती घेतल्याचे यावेळी जाहिर केले. …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, लाडकी बहीण नाही तर ‘सुरक्षित बहीण’ ही काळाची गरज शिवस्वराज्य यात्रा आता कोकणात

राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारच्या कार्यकाळात राज्यात शेतकरी, विद्यार्थी, युवक त्रस्त आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आज शिवस्वराज्य यात्रेदरम्यान म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे शिवस्वराज्य यात्रा सिंधुदुर्ग …

Read More »

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची घड्याळ चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घड्याळ चिन्हावर बंदी घालण्याची मागणी

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक चिन्ह असलेले ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यापासून मनाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता पुन्हा एकदा यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून …

Read More »