राज्यातील जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतीला पोषण देणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतला ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विकासाचे नवे पर्व घडवते आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे धरणांत साचलेल्या गाळाचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर शिवारांमध्ये करणे. परिणामी, जलसाठ्याची क्षमता वाढवली जाते आणि गाळातील पोषणमूल्ययुक्त माती शेतजमिनीत वापरून …
Read More »घाटकोपर होर्डिंग अपघात प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर दिलीप भोसले समितीकडून अहवाल सादर
घाटकोपर परिसरात होर्डिंग्ज पडण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुंबई न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीने बुधवार, ७ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला अहवाल सादर केला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, पुढील कारवाईसाठी हा अहवाल आता सीलबंद लिफाफ्यात गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. अहवालातील मजकुरात घटनेच्या तपासातील निष्कर्ष तसेच भविष्यात …
Read More »चौंडीतील मंत्री परिषदेच्या बैठकीत घेतले महत्वाचे हे निर्णय बहुतांश निर्णय पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधअयक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे आज घेण्यात आली. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” व “आदिशक्ती पुरस्कार”, राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व त्यासाठीच्या पदांना मंजूरी, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२५ साठी प्राधिकरणाचा अध्यादेश, …
Read More »अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती चौंडीतील राज्य मंत्रिमंडळ परिषदेत निर्णय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याची दृष्य स्वरुपात जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी, यासाठी मराठीसह विविध …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन
पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव – सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री पदाचा विषय येताच अजित पवार म्हणाले, शब्दच मागे घेतो म्हणजे विषय संपला १४५ आमदाराचं पाठबळ सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे
काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे झाले उपमुख्यमंत्री पद भूषविणारे अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठीचा योग काही जुळून येत नसल्याचे सांगत खंत व्यक्त केली. त्यावरून महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्ये-नेते यांच्याकडूनही यासंदर्भात भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच काय पक्षाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र महोत्सवातही प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, नवी मुंबईत ‘एज्यू सिटी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार
सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी मनोरंजन क्षेत्रातील अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञान शिक्षणासाठी नवी मुंबई येथे एज्युकेशन सिटी उभारणार
जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वेव्हज परिषदेदरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी …
Read More »मुंबईतील चित्रपटनगरीत मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात वेव्हज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल …
Read More »राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, विकसित राष्ट्र निर्माणात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिन सोहळा शिवाजी पार्क येथे संपन्न
राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित राष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताच्या अमृत काळामध्ये भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे ध्येय साध्य करताना महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे असेल. महाराष्ट्राला आधुनिक, बलशाली आणि प्रगत राज्य बनविण्यासाठी आपण सर्वांनी काम करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राज्याच्या ६६ …
Read More »
Marathi e-Batmya