Tag Archives: मुंबई

सचिन सावंत यांचा सवाल, शेलार व फडणवीसजी, मुंबईला दुसरे वित्तीय केंद्र आणण्याचे काय झाले? केंद्र सरकारसाठी फक्त गुजरातच ‘लाडके राज्य’, नरेंद्र मोदींच्या आदेशाला शिंदे व फडणवीसांची साथ

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण मागील १० वर्षांपासून केंद्र सरकारसाठी एकमेव लाडके राज्य गुजरात आहे. मोदी शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले व त्याला शिंदे, फडणवीस या नेत्यांनी साथ दिली. शिंदे, फडणवीसांनी गुजरातसाठी काम करून महाराष्ट्राचे हित उद्धवस्त करण्याचे पातक केले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या टाटा एअर बस …

Read More »

उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला वांद्रे पश्चिम मधून उमेदवारी उमेदवारी अर्ज भरण्याची कागदपत्रेही गुजरातच्या तुरुंगात पाठवली

गुजरातच्या तुरुंगात असतानाही बॉलिवूड स्टार सलमान खान यास सतत धमक्या देणे, त्याच्या घराबाहेर गोळीबार करणे आदी गोष्टी करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने नुकतेच सलमान खान याचे मित्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाब सिद्धीकी यांची हत्या केली. त्यानंतरही कोणत्या तरी उत्तर भारतीय विकास सेना नामक राजकिय पक्षाने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे पश्चिम …

Read More »

इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक - जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व २६ विधानसभा मतदारसंघातील व्यक्तींनी अथवा उमेदवारांनी इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियात प्रसृत करण्यासाठीच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. विधानसभा सार्वत्रिक …

Read More »

सलमान खान गोळीबार प्रकरण : उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, दबाव टाकणार नाही उच्च न्यायालयाने थापनच्या कुटुंबीयांना ठणकावले

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने पोलिस कोठडीत आत्महत्या केली होती. या आत्महत्या मृत्युची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांवर अहवाल सादर करण्याचा दबाव टाकणार नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच, न्यायदंडांधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ दिली. न्यायदंडाधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देताना ही …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अश्लील साहित्य’ म्हणून कलाकृती नष्ट करू नका सीमाशुल्क विभागाला करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

‘अश्लील साहित्य’ असल्याच्या कारणावरून गेल्यावर्षी जप्त केलेल्या प्रसिद्ध कलाकार एफ.एन.सौझा आणि अकबर पदमसी यांच्या कलाकृती (पेंटिंग) पुढील आदेश येईपर्यंत नष्ट करू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने सीमाशुल्क (कस्टम) विभागाला दिले. व्यावसायिक आणि कलेचे जाणकार असलेले मुस्तफा कराचीवाला यांच्या मालकीच्या बीके पॉलिमेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. …

Read More »

खिचडी घोटाळा प्रकरण : सुरज चव्हाण यांचे अटकेला आणि ईडी कोठडीला आव्हान उच्च न्यायालयाने बजावली प्रतिवाद्यांना नोटीस

कोरोनाकाळात मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांनी अटकेला तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) कोठडीला आव्हान दिले आहे. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवाध्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना १७ जानेवारीला खिचडी घोटाळा प्रकरणी …

Read More »

उच्च न्यायालयाकडून काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला दिलासा चेंबूर येथे दुचाकीला धडक प्रकरण पोलिसांवर ठपका

बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी ५ ऑक्टोबर रोजी अटक केलेला काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरेला (४२) उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. तसेच, त्याची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेशने आपली अटक बेकायदेशीर असून आपल्याला ठोठावण्यात आलेली पोलीस व न्यायालयीन कोठडी …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, पोलिसांवर काय कारवाई केली बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेची चौकशी आणि बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात कुचराई करणाऱ्या बदलापूर पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली. विभागीय चौकशीनुसार एका अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप सिद्ध झाले आहेत. …

Read More »

आदित्य ठाकरे यांचे आश्वासन, क्लस्टर डेव्हलपमेंट पॉलिसी रद्द करणार पुण्यात कोणत्या झाडीतला पैसा सापडला ? निवडणूक आयोग तटस्थ आहे की नाही आता कळेल

कोळीवाड्यातील शासनाच्या ड्राफ्ट हाउसिंग पॉलिसी बद्दल राज्य सरकारला धारेवर धरत ही पॉलिसी कोळी बांधवांसाठी अन्यायकारक असून आमचं सरकार आल्यावर पहिल्याच दिवशी ही पॉलिसी तात्काळ रद्द करणार असल्याचं आश्वासन शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिलं. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार …

Read More »

कुर्ल्यातील शाळा शिक्षक मतदानाच्या दिवशीच निवडणूकीची कामे करणार निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात माहिती

कुर्ला येथील खासगी शाळेतील शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीत आणि मतदानाच्या एक दिवस आधी व मतदानाच्या दिवशी निवडणूक कामे लावली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर, परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावण्याविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावणे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन …

Read More »