Tag Archives: राहुल गांधी

नाना पटोले यांचा सवाल, …संविधान वाचवणे भाजपा, फडणवीसांना शहरी नक्षलवाद वाटतो का? राहुल गांधींच्या पहिल्याच सभेने भाजपा घाबरली, भाजपाच्या शक्ती स्थळाजवळच कार्यक्रम घेतल्याने जळफळाट

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुर मधील पहिल्याच कार्यक्रमाने भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली असून घाबरलेल्या फडणवीसांचे ताळतंत्र सुटल्याने ते राहुल गांधींवर खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्मात लाल रंग शुभ मानला जातो पण भाजपाला तो ही अपवित्र वाटू …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, …हिंमत नसल्याने आरएसएसचा संविधानावर लपून हल्ला जातनिहाय जनगणनेच्या मागणीमुळे मोदींची झोप उडाली, काहीही झाले तरी जातनिहाय जनगणना होणार व आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत BKC मधील सभेत मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी काँग्रेसच्या ‘गॅरंटी’ जाहीर करणार.

काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर …

Read More »

प्रियंका गांधी-वड्रा यांचा आरोप, पंतप्रधान मोदींचे सरकार केवळ श्रीमंत उद्योपतींसाठी काम करतय तर राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती प्रियांका गांधी यांच्या रूपाने सर्वोत्तम खासदार वायनाडला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केरळ मधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर करण्यात आली. या जागेसाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधी-वड्रा यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर भाजपाकडून नवीन हरिदास महिला उमेदवाराची घोषणा केली. पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी वायनाड येथे एका जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरात ‘संविधान संमेलन’ विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती

भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात संविधान संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा …

Read More »

काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहिरः मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी नांदेड पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूकीसाठी ४० स्टार प्रचारक

Rahul-Gandhi-Mallikarjun-Kharge

राज्यातील विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून २९ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज उमेदवारी अर्जाची छाणणी करण्यात आली असून आजच्या दिवशी अनेक उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. महाराष्ट्रात विधानसभेबरोबरच राज्यातील नांदेड पोट निवडणूकही जाहिर करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ४० नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून यादी जाहिर …

Read More »

नाना पटोले यांची टीका, राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नेरेटिव्हचा भाजपाचा प्रयत्न लोकशाही व संविधान वाचवण्यासाठीच राहुल गांधींची लढाई; भाजपाचा मात्र मनुस्मृती लादण्याचा कुटील डाव

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भितीने भारतीय जनता पक्षच सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण व संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. …

Read More »

कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रियांका गांधी यांनी वायनाडमध्ये भरला उमेदवारी अर्ज मेघा रोड शो करत राहुल गांधी, सोनिया गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि मुलांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी बुधवारी केरळमधील वायनाडमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या पहिल्या निवडणूक लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कालपेट्टा येथील मेगा रोड शोनंतर प्रियंका जिल्हाधिकारी कार्यालयात गेली आणि जिल्हाधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर डीआर मेघाश्री यांच्याकडे कागदपत्र सादर केले. आई सोनिया गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के …

Read More »

चेन्नई जवळ म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसचा भीषण अपघातः राहुल गांधी यांचा सवाल थांबलेल्या मालगाडीवर प्रवासी ट्रेन आदळून अपघात

चेन्नई विभागातील कावराई पेच्चई येथे रेल्वे मार्गावरील एका सिग्नल फेल झाल्याने तेथून जाणाऱ्या म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी थांबलेल्या मालगाडीवर म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेस आदळून अपघात झाला. दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागातील गुम्मीडीपुंडीजवळ कावराईपेट्टई येथे हा अपघात झाला. अपघातानंतर म्हैसूर-दरभंगा गाडीचे अनेक डबे घसरले आणि …

Read More »

राहुल गांधी यांची खंत, दलित मागासांचा इतिहास पुढे आला पाहिजे

दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी संस्थाच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे असून संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची ५० % ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहे, इंडिया आघाडी ही मर्यादा हटवेल आणि …

Read More »