काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वड्डेटीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांविषयी केलेले विधान हे अत्यंत क्लेशदायक, निषेधार्ह व लांच्छनास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे पुढे म्हणाले की, “लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबियांनी देशाच्या सांस्कृतिक वैभवात मोलाचे योगदान दिले आहे. मास्टर …
Read More »चार महिन्यानंतर विधिमंडळाच्या समित्या जाहिर लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवार
राज्य सरकारकडून मागील कालावधीतील केलेल्या चूकीत सुधारणा करत यावेळी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सत्तेवर आपली पूर्ण मांड व्यवस्थित बसविल्यानंतर आणि चार महिन्याच्या कालावधीनंतर राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यावरील नियुक्त्या जाहिर केल्या आहे. विशेष म्हणजे या समित्यांवर महायुतीतील आमदारांचाच वरचष्मा कसा राहिल याकडे महायुती सरकारने लक्ष दिले आहे. राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा इशारा, संविधान बदलण्याचा प्रयत्न कराल तर सत्ता बदलली जाईल संविधानाची पायमल्ली केली जात आहे, सत्ताधाऱ्यांनी अंतर्मुख व्हावे
भारत या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला काय अधिकार आहेत, आपली कर्तव्य काय आहे हे आपल्याला संविधानाने शिकवले. कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा म्हणून सर्वश्रेष्ठ असलेला ग्रंथ संविधान आहे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित संविधानाची गौरवशाली वाटचाल या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य …
Read More »शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार: मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार
आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच असा निर्धार १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला. प्रत्येक …
Read More »वाघ-बिबट्यांचे हल्ले, गावांना साळखी कुंपण घालण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी साखळी कुंपनासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती
भंडारालगत कोका वन्यजीवन अभयारण्याच्या बफर झोन जवळील गावात महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. यामुळे जनतेत रोष आहे. या प्रकरणी लोकांनी वन विभागाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. बिबट्याच्या हल्ल्यात देखील लोकांची जीवित हानी होत आहे. त्यामुळे वाघ आणि बिबटे ज्या गावाच्या आसपास येतात त्या गावांना साखळी कुंपण घालावे अशी मागणी …
Read More »अबू आझमीवर कारवाई कराच पण शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांचा संतप्त सवाल
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या प्रकरणी सरकारने अबू आझमी यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य बेजबाबदार पणाचे होते. त्यांच्यावर …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, विमान शोधणारे पोलिस बलात्काऱ्याला अद्याप जेरबंद…लाजीरवाणी गोष्ट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस
पुणे येथील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये पहाटेच्यावेळी एका २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुणेसह महाराष्ट्र हादरले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राजकिय वर्तुळातून उमटत असून पुणे पोलिस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांच्या कार्यक्षमतेवर आणि सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी रद्दचा आदेश कधी? राहुल गांधी आणि सुनिल केदार यांच्याबाबत २४ तासात आदेश
आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर २४ तासाच्या आत खासदार की करण्यात आली. तर काँग्रेसचे राज्यातील आमदार सुनिल केदार यांची आमदारकी त्याच न्यायाने २४ तासात रद्द केली. मात्र आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार असा सवाल …
Read More »महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वोदयी हर्षवर्धन सपकाळः कोण आहेत सपकाळ तर विधानसभेच्या काँग्रेस गटनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्विकारून नाना पटोले यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरु झाली होती. तसेच नाना पटोले यांच्याऐवजी यापुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी नव्य़ा व्यक्तीची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आज अखेर बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन …
Read More »राहुल शेवाळे यांचे वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर, येत्या २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा २३ जानेवारीला मुंबईत सत्कार सोहळा
शिवसेना मंत्री उदय सामंत यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तर देताना राहुल शेवाळे म्हणाले की, उबाठाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असून येत्या २३ जानेवारी रोजी मोठा राजकीय भूकंप होईल. त्यामुळे धास्तावलेले विरोधक शिवसेनेबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. उदय कोणाचा होणार यावर चर्चा करण्यापेक्षा उबाठा गटाच्या अस्ताबाबत …
Read More »
Marathi e-Batmya