विजय वडेट्टीवार यांचा सवाल, माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी रद्दचा आदेश कधी? राहुल गांधी आणि सुनिल केदार यांच्याबाबत २४ तासात आदेश

आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर २४ तासाच्या आत खासदार की करण्यात आली. तर काँग्रेसचे राज्यातील आमदार सुनिल केदार यांची आमदारकी त्याच न्यायाने २४ तासात रद्द केली. मात्र आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी  रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार असा सवाल यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली. सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी २४ तासांत आमदारकी रद्द केली. आता, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे? असा सवालही यावेळी केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही? त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली, तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ता आहे म्हणून ‘आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड‘ ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय ? असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत- राज ठाकरे

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *