Breaking News

Tag Archives: शिवाजी महाराज पुतळा

राहुल गांधी यांची टीका, या तीन कारणामुळे मोदींनी माफी मागितली… महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी

नौदल दिनाचे औचित्य साधत सिंधूदुर्गातील मालवण येथे २८ फुटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. परंतु या पुतळ्यास आठ महिन्याचा कालावधीही होत नाही तोच हा पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यातील जनतेत एकप्रकारची संताप व्यक्त झाल्याचे पाह्यला मिळाले. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीने या प्रकारावरून निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर …

Read More »

रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती, शिवाजी महाराजांचा पुतळा… निर्णय चुकीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मालवण मधील राजकोट किल्ल्याला भेट

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुःखद मनाला चटका लावणारी आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम नवोदित शिल्पकारास देण्याचा निर्णय चुकीचा होता. राज्यात राम सुतार आणि सारंग सारखे ज्येष्ठ अनुभवी शिल्पकार असताना नवोदितांना ही मोठी जबाबदारी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, त्या कृत्यांबद्दल काँग्रेस माफी मागणार का? शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही

मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडल्याच्या निषेधार्थ विरोधक महाविकास आघाडीच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन पुकारत भलामोठा मोर्चा काढला. या मोर्चात शिवद्रोही सरकार म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून चुकीला माफी …

Read More »

जोडे मारो आंदोलनः शरद पवार यांचा आरोप, मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्टाचाराचा… शिवप्रेमी जनतेचा अपमान केला

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्यानिमित्ताने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप गेट वे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »

नाना पटोले यांची टीका,… माफी मागून पंतप्रधानांनी चूक मान्य केली महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्या शिंदे व फडणवीसांनी सत्तेतून पायउतार व्हावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असतानाही महा भ्रष्ट भाजपा युती सरकारला लाज वाटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या ८ महिन्यातच तो पुतळा कोसळला, हा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान धुळीस मिळाला. जनतेच्या तीव्र …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची शिवाजी महाराजांची माफी मागतानाही राहुल गांधींवर टीका स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर यांच्या अवमानाचा शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची तुलना

शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून दैवतासमोर अनेकवेळा झुकले तरी आम्हाला त्याचे वावगे नाही. सिंधूदुर्गात मागील काही दिवसात जी घटना घडली. त्या घटनेबद्दल मनात खेद आहे. तसेच या घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची पायाशी डोकं ठेवत त्यांची माफी मागत असल्याचे सांगत काहीजण स्वातंत्रवीर वि दा सावरकर यांचा अवमान करतात परंतु …

Read More »

नाना पटोले यांची टीका, आंदोलकांना नजरकैद.. भाजपा सरकार मोगलाईपेक्षा वाईट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेत तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण घाईघाईने केले होते. राजकीय लाभ उठवण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केल्याने लोकांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री माफी मागत असले तरी त्याचा काही फायदा नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, महाराजांचा नवा पुतळा उभारणार, समितीची स्थापना वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत निर्णय

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली, अखेर माफी त्याच ठिकाणी दुसरा पुतळा उभारणार

मालवणमधील शिवाजी महाराज पुतळा आठ महिन्यातच कोसळून पडला. या पुतळा प्रकरणावरून राज्यातील सर्व राजकिय पक्षांनी सत्ताधाऱांना धारेवर धरायला सुरुवात केली. तसेच या घटनेवरून राजकिय कुरघोडी नाट्याला सुरुवातही झाली. यावरून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना माफी मागितली. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाप्रकरणी नौदलाची चौकशी समिती संयुक्त तांत्रिक समिती केंद्रीय संरक्षण विभागाकडून नियुक्त

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली एक संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेच्या वारशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, तसेच …

Read More »