राहुल गांधी यांची टीका, या तीन कारणामुळे मोदींनी माफी मागितली… महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी

नौदल दिनाचे औचित्य साधत सिंधूदुर्गातील मालवण येथे २८ फुटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. परंतु या पुतळ्यास आठ महिन्याचा कालावधीही होत नाही तोच हा पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यातील जनतेत एकप्रकारची संताप व्यक्त झाल्याचे पाह्यला मिळाले. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीने या प्रकारावरून निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर पालघर येथील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागून पुतळा कोसळल्याच्याप्रकरणी शिवाजी महाराजांची माफी मागितली.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागताना, स्वा. वि दा सावरकर यांच्यावरील टीकेचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसेच शिवाजी महाराजांची माफी मागतानाही एक प्रकारचे उपकारच करत असल्याचे मोदी यांनी दाखवून दिल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. तसेच या माफीनाम्यावरून मोदी यांच्यावर टीकाही केली.

यासंदर्भात बोलताना राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत माफी मागणारा व्यक्ती हा काही तरी चुकीचे केले म्हणून माफी मागत असल्याची सांगत पंतप्रधान मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली पण ही माफी त्यांनी पुतळ्याचे काम आरएसएसच्या व्यक्तीला दिले म्हणून माफी मागितली का, की पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली? की शिवाजी महाराज यांचा अपमान करायचा होता म्हणून माफी मागितली अशी तीन कारणे सांगत यासाठीच पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली असेल असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

तसेच पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, माफीचे कारण काहीही असो पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागायचीच असेल तर ती महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे असे सांगत शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी शहीद झाले, नोटबंदीमुळे लघु, छोटे, मध्यम उद्योग संपवले व लाखो लोकांचे रोजगार घालवले, चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावला त्याबद्दलही माफी मागितली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, एसआयआर नोंदणी, रोल बॅक व दावे हरकतीसाठी कालावधी वाढवून द्या ‘शहरी नक्षलवादी’, ‘दिमागी नक्षलवादी’, असे शब्द पंतप्रधानांच्या तोंडी येतातच कसे? देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी दिमागी नक्षलवादी आहेत का?

महाराष्ट्रात पुढील तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका होणार नाहीत, असे असताना निवडणूक आयोग ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *