देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याच दिवशी देशाला भारतीय संविधान लागू झाले. या संविधानातून मिळालेल्या अधिकाराबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, संविधान आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना …
Read More »७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य, हा विचार घेऊन, देशाने गेल्या ७५ वर्षांची …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे जिल्हा अग्रेसर…. पायाभूत सुविधा, रस्ते विकास, शेती प्रगती, सामाजिक अन् आरोग्य क्षेत्रात सुधारणा
आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले …
Read More »राज्यपाल यांची साद, नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राष्ट्रध्वजाला वंदन
सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. सर्वांना एकत्र येऊन नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया आणि एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन त्यांनी …
Read More »नाना पटोले यांची टीका, झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करा सरकारचे बगलबच्च्यांच्या साखर कारखान्यांना १०० कोटींचे व्याज माफ पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस पैसे नाहीत
लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला …
Read More »प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुरस्कार सन्मार्थींची यादी जाहिर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाच्या मान्यतेने केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध कला, सामाजिक, कृषी, उद्योग व व्यापार क्षेत्रासह, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरवित त्यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली. पद्मश्री पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार देताना प्रामुख्याने विचार केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्काराने अच्युत पालव …
Read More »२६ जानेवारीला ध्वजवंदनसाठी कोणता पालकमंत्री कोठे उपस्थित राहणार जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित …
Read More »लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत मिळणार महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य …
Read More »नाना पटोले यांचे आवाहन, धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेका…
देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ते आज स्पष्ट दिसत आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली, बलिदान द्यावे लागले. सत्तेत आज धर्मांध शक्ती आहेत आणि लोकशाही, संविधान, सर्व लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली …
Read More »७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, राम मंदिर…
मागील दोन वर्षाच्या कालावधीत जवळपास चार ते पाच मोठ्या घटना घडल्या. त्यातील राजपथाला कर्तव्य पथ असे नामकरण करणे, नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन, आणि राम मंदिराची अयोध्येत उभारणी करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या गैरहजेरीत हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यात आले. वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्षे पूर्ण …
Read More »
Marathi e-Batmya