Tag Archives: ajit pawar

शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त, तर गरीबांना गरीब करण्याचे काम सरकार करतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप

वाशिम – कारंजा: प्रतिनिधी रोज महाराष्ट्रात ५ ते ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत. १६ हजार शेतकरी महिला विधवा झाल्या, त्यांचे संसार उध्वस्त होत आले आहेत. गरीबांना गरीब करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. माणसं फोडण्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करत असून कर्नाटकच्या …

Read More »

सरकारला कशाची मस्ती आलीय… कसली शेतकऱ्यांची टिंगल टवाळी लावलीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

औरंगाबाद – बालानगरः प्रतिनिधी या सरकारला कशाची मस्ती आलीय, शेतकऱ्यांची कसली टिंगल टवाळी सुरु आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी बालानगर येथील जाहीर सभेत केला. पुरग्रस्त भागात भाजपचे मंत्री सेल्फी काढणाऱ्या भाजप मंत्र्याचा आणि सरकारचा भोंगळ कारभारावर अजितदादा पवार यांनी जोरदार आसूड ओढला. शिवस्वराज्य यात्रेच्या दुसर्‍या …

Read More »

पुरग्रस्तांना एक हात मदतीचा… राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एक महिन्याचा पगार देणार मुंबई अध्यक्ष तथा राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यात कोल्हापुर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे जिल्हे मोठ्याप्रमाणावर पुराचा सामना करत आहेत. दहा जिल्हयात पूरग्रस्त परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात मग्न होते हे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर करत पूरग्रस्तांना मदत म्हणून राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तासाठी देणार …

Read More »

डोक्यावरून पाणी गेल्यावर मुख्यमंत्र्यांना लक्षात आले राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांचा उपरोधिक टोला

शिर्डी: प्रतिनिधी राज्यात संकट आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची महाजनादेश यात्रा थांबवायला पाहिजे होती. मात्र त्यांची यात्रा सुरुच असून आम्ही आक्षेप घेतल्यावर त्यांनी एक दिवस बंद ठेवली. जर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेळीच सुचना द्यायला हव्या होत्या. मात्र डोक्यावरुन पाणी वाहायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आल्याचा उपरोधिक टोला अजितदादा पवार यांनी …

Read More »

१५ हजार ‌शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप

अहमदनगरः प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे भाजप – शिवसेना सरकारचे अपयश आहे. मात्र राज्यातील सगळ्या जनतेने गुण्यागोविंदाने नांदावे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. हे राज्य सुजलाम सुफलाम कसे होईल याकडे राष्ट्रवादीचे लक्ष असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केली. आज बेकारीने तोंड वर काढले …

Read More »

पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सवाल

पुणे – राजगुरुनगर – खेडः प्रतिनिधी आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला केला. शिवस्वराज्य यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर – खेड येथे पार पडली. …

Read More »

निवडणूक न लढविणारे ईव्हीएमवर बोलतायत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबईः प्रतिनिधी जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, ते आता कोलकात्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जाऊ लागले आहेत. या पत्रकार परिषदेतील काही नेते ईव्हीएम बाबत बोलत आहेत. त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही त्यांनी आधी निवडणूक लढवून दाखवावी. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी निवडणूकच लढविली नाही त्यांनी …

Read More »

ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला विरोधात मोर्चा विरोधकांचा एल्गार

मुंबईः प्रतिनिधी ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत येत्या २१ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वांद्रे येथे झालेल्या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे …

Read More »

पुलवामा, बालाकोट हल्ल्यातील शहीदांना आदरांजली पण त्यांचे प्रश्न तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी जनता व्यक्ती म्हणून कुणाच्या हाती सरकार दिले पाहिजे याचा विचार करते. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मानवंदना वाहिली. मात्र महाराष्ट्रातील शहीदांचे त्यांच्या कुटुबीयांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला …

Read More »

सरकारच्या चहापानावर बहिष्कार; विरोधी पक्षांचा निर्णय फडणवीस सरकार म्हणजे 'आभासी' सरकार - धनंजय मुंडे

मुंबईः प्रतिनिधी या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार असल्याचा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. १७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या …

Read More »