मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न होवून आठवडा होत आला आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पहिल्यांदा शपथ घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांचे खातेवाटपही होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री पदावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली असल्याने मंत्र्यांच्या खात्याचे वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार …
Read More »नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रवादीची ८० लाख रूपयांची मदत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी होणार मदतीचे वाटप करणार
मुंबईः प्रतिनिधी मान्सूनचा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हेक्टरी ८ आणि १८ हजार रूपयांची मदत जाहीर केली. मात्र ही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ८० लाख रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. …
Read More »मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या ६ मजल्यावर फक्त मुख्यमंत्रीच पवार, खडसे, डॉ.बोंडेमुळे मविआचे मंत्री म्हणतात ६ मजला नको
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळात सध्या ७ मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी ६ व्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दालन राहणार आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला …
Read More »अभिनंदनावेळी मुख्यमंत्री म्हणाले “मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो” संसदीय भाषेत मुख्यमंत्री ठाकरेंची फडणवीसांवर टोलेबाजी
मुंबईः विशेष प्रतिनिधी भाषण काल माझा सभागृहातला पहिला दिवस होता. मी माझ्या मंत्र्यांची सभागृहात ओळख करुन दिली. आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यासाठी मी उभा असून माझ्यासमोर त्यांची जी ओळख आली, ती आधीच यायला पाहीजे होती अशी उपरोधिक चिमटा काढत मी येईन असे कधी म्हणालो नव्हतो पण इथे आलो असे फडणवीस …
Read More »फडणवीस हे कोणात्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत अशी अपेक्षा मंत्री जयंत पाटील यांचा विरोधी पक्षनेते आणि अजित पवारांना टोला
मुंबईः विशेष प्रतिनिधी राजकारणात सत्तेच्या बाकावर किंवा विरोधकांच्या बाकावर असो आपली सद्सदविवेक बुध्दी शाबूत ठेवावी लागते. जर सद्सदविवेक बुध्दी हरवली की आपली दिशा आणि ध्येक चुकते. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे इथल्या कोणत्याही सदस्यांच्या प्रलोभनाला बळी पडून त्या बाकावरून या बाकावर येण्याचा प्रयत्न करणार नाहीत असा …
Read More »भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजित पवारांच्या शुध्दीकरणाची भाजपाकडून सुरुवात विदर्भ पाटबंधारेतील ९ प्रकल्पांच्या नस्तीबंद करण्याचे आदेश
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराचे डाग पुसून काढण्याच्या हालचाली भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केली. या शुध्दीकरणाच्या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील विदर्भ पाटबंधारे अंतर्गत असलेल्या ९ प्रकल्पांच्या चौकशीच्या फाईली बंद करण्याचे आदेश एसीबीने दिले. विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या आधी उपमुख्यमंत्री …
Read More »काळे कारनामे करून लपून छपून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस काळ्या अक्षरात लिहिला जाईलः खा. अहमद पटेल
मुंबईः प्रतिनिधी रात्रीच्या अंधारात काळे कारनामे करून आज सकाळी कोणालाही न सांगता लपून छपून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामागे काळेबेरे आहे, हे निश्चित. भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून संविधानाची पायमल्ली केली जात आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहीला जाईल अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. अहमद …
Read More »पुन्हा आलेले देवेंद्र सरकार ३० तारखेला बहुमत सिध्द करणार राज्यपालांनी दिली सात दिवसांची मुदत
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीदरम्यान मी पुन्हा येईनची घोषणा देणारे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली घोषणा खरी करून दाखवित आज नाट्यमय पध्दतीने राजकिय हालचाली करत राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या नव्या देवेंद्र सरकारला राज्यपालांनी ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतची …
Read More »शरद पवारांच्या पुलोदची पुनःरावृत्ती की मराठेशाहीतील फंदफितुरीची परंपरा ? विधानसभेत दिसणार राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा
साधारणतः १९७८ साली राज्यातील मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पाडत त्यावेळचे काँग्रेस नेते शरद पवार यांनी समाजवादी पक्ष, जनसंघ सारख्या पक्षांना सोबत घेत पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग करत नवे सरकार स्थापन केले होते. त्यास जवळपास ४१ वर्षे झाली. नेमक्या त्याच पध्दतीची राजकिय परिस्थिती राज्याच्या राजकारणात दिसून येत असून …
Read More »शिकाँरात आम्ही आहोत…राहणार आणि सरकारही येणार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असून त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. त्याचबरोबर जे आमदार त्यांच्यासोबत गेले ते परत आमच्याशी संपर्क साधून आमच्याकडे येत असल्याचे सांगत शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहोत, एकत्र राहणार असून राज्यात या तीन पक्षाचे सरकार येणार …
Read More »
Marathi e-Batmya