Tag Archives: ajit pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचा आता कोकणात हल्लाबोल आंबा, काजू शेतकऱी आणि मच्छिमारांच्या प्रश्नावर आंदोलन छेडणार

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाकर्त्या सरकारवर हल्लाबोल केला त्यानंतर चौथा टप्पा २ ते १२ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात झाला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात मिळाला. कोल्हापूरपासून सुरु झालेल्या हल्लाबोल आंदोलनातील शेवटची सभा पुण्याच्या वडगांवशेरी-खराडी येथे झाली. आता पुढील …

Read More »

तुमची औकात तरी आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सरकारवर टीका

सातारा- दहिवडी : प्रतिनिधी नुकत्याच मुंबईत झालेल्या भाजपच्या महामेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करत चहावाल्यांच्या नादीला लागाल तर तुम्ही औषधालाही शिल्लक राहणार नसल्याची टीका केली. त्या टीकेचा खरपूस समाचार घेत पवार साहेबांचे बोट पकडून यांचे गुरु राजकारणात आले आणि हे भाजपचे …

Read More »

अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावरुन सत्ताधारी विरोधक आमने-सामने गोंधळामुळे विधानसभा तीनवेळा तहकूब

मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाऐवजी राज्य सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडत तो लगबगीने शुक्रवारी मंजूर केला. त्यावरून आज सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येत चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले. शुक्रवारी सत्ताधाऱ्यांनी जे कामकाज केले ते म्हणजे विधानसभेच्या …

Read More »

हिंमत असेल तर ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळात विरोध करून दाखवा शिवसेनेच्या नौटंकीवर विरोधकाचे टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्यासंदर्भात सरकारची भूमिका चुकीचीच आहे. हा निर्णय रद्द झालाच पाहिजे. पण शिवसेनेने यासंदर्भात सभागृहात गोंधळ घालून राजदंड उचलणे म्हणजे शुद्ध नौटंकी आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध करून दाखवावा, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी …

Read More »

औरंगाबादेतील कायदा व सुव्यवस्थेचा ‘कचरा’ केल्याने आयुक्त यादव घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले सक्तीच्या रजेवर: काँग्रेससह सर्व पक्षांनी कामकाज रोखून धरले

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद येथील कचरा डेपोच्या प्रश्नी नागरीकांनी विरोध करत आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला. तसेच आंदोलनकर्त्या नागरीकांवर अमानुष लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेचे कामकाज रोखून धरत औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना निलंबित करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर अखेर …

Read More »

राज्याची महसूली तूट शुन्यावर आणणार आणखी ५-६ वर्षे काम करावे लागणार असल्याची अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या महसूली उत्पन्नात १५ हजार कोटी महसुली तूट येणार असल्याचे जरी स्पष्ट असले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी हा खर्च आहे. त्यामुळे ही तूट येणार असल्याचे सांगत महसुली तूट रकमेत मोजायची नसते. २००९-१० मध्ये महसुली तुटीची टक्केवारी ९४ टक्के होती ती आता ५५ टक्क्यांवर …

Read More »

अर्थसंकल्पात फक्त आश्वासनांचे बुडबुडे अजित पवार यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना समप्रमाणात निधी मिळेल असे वाटले होते. मात्र सरकारने कोणत्याच घटकाला योग्य निधी ना न्याय दिल्याचा आरोप करत आरोग्य खात्याला निधीची कमतरता भासत आहे. सोय सुविधा नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. सर्वच खात्याची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थसंकल्प निराशाजनक असून फक्त आश्वासनांचे …

Read More »

जेव्हा अध्यक्ष महाराज आमदारांची शाळा घेतात… भाजपच्या मुख्य प्रतोदांना अध्यक्ष बागडेंची ताकीद

मुंबई : बी.निलेश विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज भाजपचे आमदार आणि मुख्य प्रतोद राज पुरोहित यांना आपली जागा बदलण्यास मज्जाव घातला आणि काही मीनिटांसाठी आपण शाळेत आहोत की असा भास सर्वच आमदारांना झाला… घटना अशी घडली की… राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विरोध पक्षांनी मांडलेल्या मराठी शाळांबाबतच्या २९३ अन्वये …

Read More »

शाळांचे समायोजन केले, बंद नाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कमी पटसंख्या असेल्या १३०० शाळा बंद नाही तर त्यांचे १ किलोमीटर अंतराच्या परिसरातील इतर शाळांमध्ये समावेश करण्यात आलेले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून त्यांच्या सहली, गँदरींग आदी गोष्टी होत असल्याने त्यांच्या अभ्यासाला गती मिळत असल्याचा दावा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. तसेच या …

Read More »

शिक्षणाला विनोदाच्या तावडीतून सोडवा अजित पवार यांचे शिक्षण विभागावर शरसंधान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे हा विभाग हाताळण्यास अपयशी ठरले आहे. शिक्षणाचा विनोद झाला आहे. या ‘विनोदा’च्या तावडीतून शिक्षण खात्याला सोडवा अशी टीका करत राज्यातील वसतिगृहाची परिस्थिती बिकट आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत, मुलांना शिष्यवृत्त्या मिळाल्या पहिजे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे …

Read More »