केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण १० ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे …
Read More »अजित पवार यांचे आदेश, या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखा बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय, राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा
बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच या स्मारकांच्या परिसरातील एकही …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता भविष्यात रस्ता बनविताना परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' निर्माण करा
नागपूर ते चंद्रपूर या २०४ किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भविष्यामध्ये …
Read More »अजित पवार यांची माहिती, लस निर्मितीसाठी हाफकिनला २५ कोटी हापकिन सक्षमीकरण : डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी त्रिसदस्य समिती
लस निर्मितीच्या क्षेत्रात हाफकिन संस्थेचं मोलाचं योगदान असून देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये हाफकिनचा मोठा वाटा आहे. भारत सरकारकडून पोलिओच्या २६८ दशलक्ष मौखिक लसींची मागणी आहे. या लसींची निर्मिती करण्यासाठी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हाफकिन खरेदी कक्षाच्या दोन टक्के उपकारातून २५ कोटी रुपयांचा निधी देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी बीड तालुक्यातील मौजे पिंपळगाव घाट, मौजे हिंगणी खुर्द, मौजे आहेर चिंचोली, खामगाव, नांदूर हवेली गावांची केली पाहणी
बीड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या पुरामुळे नदी काठावरील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावात नदीचे पाणी घरात व शेतशिवारात घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती, राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती
महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी …
Read More »अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे अन्य महत्वाचे निर्णय नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेज, अकोला येथील भाजी बाजार उभारणीसाठी जमिनीसह घेतले अनेक महत्वाचे निर्णय़
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली या बैठकीत नागपूर-नागभीड रेल्वे मार्गाचे ब्रॅाडगेज मार्गाच्या रुपांतरणाला चालना, अकोला महानगरपालिकेला शहर बसस्थानक, भाजी बाजार उभारण्यासाठी जमीन, वसई-विरारला महापालिकेला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आचोळे येथील जमीन, सोलापूरच्या कॉ. साने महिला गृहनिर्माण संस्थेला नोंदणी आणि मुद्रांक शुल्कात सवलत, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला सवलतीच्या दरात भूखंड आदी …
Read More »अजित पवार यांचे आदेश, रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींचे प्रश्न मार्गी लावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक …
Read More »प्रस्तावाचा पत्ता नाही आणि मंत्री म्हणतो, फाईल पाठविली, निधी का देत नाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयएएस अधिकाऱ्याला बोलावून विचारणा
राज्यातील महायुती सरकारकडून एकापेक्षा एक घोषणा केल्या जात आहेत. जसे काही राज्याच्या तिजोरीत पैशांचा ढिगारा लागला आहे. खर्च करायला योजना नाही अशा थाटात राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. तसेच मागील काही दिवसात राज्यात मान्सूनच्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्व जनतेला गारठून टाकलं आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यास राज्य …
Read More »
Marathi e-Batmya