Tag Archives: ajit pawar

अजित पवार यांची मुरलीधर मोहोळ आणि संदिप जोशी यांच्याबाबत मांडली भूमिका निवडणुकीत कोणी राजकारण आणू नये, खिलाडूवृत्ती हवी; खेळाडूंवर क्रीडामंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले. अजित पवार म्हणाले की, सन २०१३ पासून आपण महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल

‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्व अधोरेखित होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच प्रदूषणावर मात करत पुण्याची “सायकलचे शहर” ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्य शासन, पुणे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे हे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या झालेल्या बैठकीत घेतले हे सात निर्णय

विकसित महाराष्ट्र – २०४७ व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिजन मॅनेंजमेंट युनिट राज्यातील नागरिकांकडून विकसित महाराष्ट्र- २०४७ संदर्भात मते, अपेक्षा, अभिप्राय, आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या मदतीने राज्यव्यापी सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या आधारे तयार करण्यात आलेल्या विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला तसेच …

Read More »

आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला यश, भूखंड सुपुर्द वित्तमंत्री अजित पवार यांचे उर्दू घरासाठी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन

भिवंडीमध्ये लवकरच शानदार ‘उर्दू घर’ उभे राहणार आहे. या प्रस्तावित उर्दू घरासाठी आवश्यक २५०० चाै. मी. भूखंड ठाणे जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडे नुकताच सुपूर्त केला. भिवंडीत उर्दू घर उभे राहावे, यासाठी ‘भिवंडी पूर्व’चे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख सातत्याने पाठपुरावा करत होते. आमदार शेख यांच्या पाच वर्षाच्या पाठपुराव्याला …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी

भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, झोपडपट्टीवासी रहिवाशांचे स्वप्न दोन वर्षात पूर्ण करणार समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सर्व सोयी सुविधांयुक्त सुंदर घर

समूह विकासाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सुंदर व सर्व सुविधायुक्त असे घर मोफत देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे. कुणालाही विकास आणि घरापासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घराचे स्वप्न …

Read More »

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी ५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यातून जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत बांबू उत्पादनात महाराष्ट्राचे स्थान आणखी बळकट करण्यात येणार आहे. राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची अपेक्षा, ‘इंडिया मेरीटाईम वीकसाठी केंद्राने मुंबईत कायमचे केंद्र उभारावे २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ चे आयोजन

भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक २०२५’ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने मुंबई येथे कायमचे केंद्र उभारावे. महाराष्ट्र या केंद्राचा जागतिक स्तरावर विकास करण्याबरोबर इंडिया मेरीटाईम वीक ही थीम जागतिक स्तरावर निर्माण करेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केला. मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘इंडिया …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित

आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत

राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये २९ जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त २५३ तालुके आणि २०५९ मंडळांमध्ये मदतीसाठी ६५ मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी ३१ हजार …

Read More »