नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगर पंचायतीचे मतदान संपल्यानंतर १७ ईव्हीएम मशीनचे सील तोडून पुन्हा मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण अद्याप एफआयआरही दाखल केलेला नाही. हे सर्व प्रकार लोकशाहीचे वस्त्रहरण करणारे आहे, असा गंभीर …
Read More »चंद्रकांत पाटील यांची माहिती, उच्च शिक्षण विभागांतर्गत मुंबईतील कार्यालये एकाच ठिकाणी होणार चेंबूर येथील उच्च शिक्षण विभागाच्या इमारत बांधकामास गती द्यावी
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली काही महत्वाची कार्यालय आणि विभागीय कार्यालय मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आणि काही भाडेत्त्वावरील जागेत आहेत. या सर्व कार्यालयांना एकाच ठिकाणी आणण्यासाठी चेंबूर येथे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला अधिक गती देऊन पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुरू करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण …
Read More »भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न
कामाला महत्त्व देणारी, संकटात साथ देणारी आणि आपत्तीत मदत करणारी ही खरी शिवसेना आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती जनता या निवडणुकीत नक्की देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे येथील स्वर्गीय गंगुबाई शिंदे सभागृहात कल्याण डोंबिवलीमधील भाजपाचे तीन नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी आणि …
Read More »उद्धव ठाकरे यांची टीका, आधी पक्ष, मग मतचोरी आता जमीनही चोरायला लागले परभणी, पाटोदा भेटीत शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे
शेतकरी खूप व्यथेने व्याकुळ झाला आहे. भ्रष्टाचार सुरू असल्याने मत चोरीशिवाय पर्याय राहिला नाही. आधी पक्ष चोरला, माणसे चोरली, मतांची चोरी केली. आणि त्यानंतर आता जमीनही चोरल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत भाजपाच्या काळात न्याय मागितला तर नक्षलवादी म्हणत आहे. शेतकर्यांना त्याच्या मेहनतीची कर्जमुक्ती मिळावी. कृषी मंत्री …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, पुणे जमिन घोटाळ्याचा विषय गंभीर आहे तर चौकशी झाली पाहिजे jराजकारणात कुटुंब आणत नाही
राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर आमची विचारधारा आणतो अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी …
Read More »मतचोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसचे मेट्रो व लोकल मध्ये जनजागृती अभियान भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या मतचोरीच्या विरोधात आंदोलन
देशात निवडणूका निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे पण लोकशाहीच्या या महत्वाच्या स्तंभावर संशयाचे ढग जमा झाले आहेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. या मतचोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल पाच सदस्यांची उच्चस्तरीय समिती
पुणे येथील कथित जमीन अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश आज जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुणे शहरातील मुंढवा …
Read More »राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, पार्थ पवार महार वतन जमिनप्रकरणी गप्प का? महार वतन जमिन खरेदीवरून राहुल गांधी यांचा मोदी यांना आवाहन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महार वतनाची १८०० कोटी रूपये किंमतीची पुणे येथील कोरेगांव पार्क येथील ४० एकर जमिन खरेदी प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले. तसेच ही जमिनी ३०० कोटी रूपयांना खरेदी करून फक्त ५०० रूपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे राजकिय वर्तुळात एकच …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम’ गीताचे गायन
जात, पंथ, धर्म, भाषांचे भेद विसरून स्वातंत्र्यलढ्यात सर्वांनी वंदे मातरम् म्हटले होते. वंदे मातरम् हा स्वातंत्र्यलढ्याचा परवलीचा शब्द होता आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्यही याच गीतातून तयार झाले. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि एकात्मता आवश्यक आहे. यासाठी ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामुहिक …
Read More »बिहार विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात ६४.४६ टक्के मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले
गुरुवारी (६ नोव्हेंबर २०२५) बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर मतदान संपले तेव्हा तात्पुरते ६४.४६% मतदान झाले, असे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) विनोद सिंग गुंजियाल यांनी सांगितले. दोन्ही आघाडीतील लहान पक्षांसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. सीपीआय (एमएल) ज्या २० जागांवर निवडणूक लढवत आहे त्यापैकी दहा जागा या टप्प्यात येतात, …
Read More »
Marathi e-Batmya