औरंगाबाद : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नामांतराचा मुद्दा उपस्थित होत भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या राजकिय कुरघोड्यांना ऊत येत भाजपानेही संभाजीनगर नामांतर कधी करणार असा सवाल करत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अखेर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच औरंगाबादाचा उल्लेख संभाजीनगर करत अनौपचारीक नामांतर …
Read More »सुधीर मुनगंटीवारांच्या खुलाशामुळे अजित पवारांची अडचण होणार ? पेट्रोल-डिझेलचा जीएसटी करात समाविष्ट करण्याचे या आधीच राज्य सरकारचे पत्र
मुंबई: विशेष प्रतिनिधी देशातील नागरीकांना स्वत: दरात पेट्रोल-डिझेल देण्यासाठी या दोन्ही वस्तुंचा समावेश जीएसटीत करण्याचे संकेत केंद्राने दिल्यानंतर यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राला राज्याच्या कर लागू करण्याच्या अधिकार गदा आणू नका असा इशारा दिला. त्यास काही तासांचाच अवधी लोटला नाही तोच भाजपा नेते तथा माजी अर्थमंत्री …
Read More »तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल…संभाजी बिग्रेडचा प्रस्ताव आल्यावर निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मत
पुणे (देहू) : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा अध्यादेश न्यायालयात टिकावा अशी आपली इच्छा आहे. पण हा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. राज्यातील ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण टिकविण्याचा …
Read More »मोदींच्या वाढदिवशी युवक काँग्रेसकडून आंदोलनरुपी भेट मोदींचा वाढदिन युवक काँग्रेस साजरा करणार ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’
मुंबई: प्रतिनिधी देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ७ वर्षात हे आश्वासन पाळले नाही. रोजगार निर्मिती दूर राहिली जे रोजगार होते ते ही गेले आणि ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला. युवकांची स्वप्नं धुळीस मिळवून त्यांचे भविष्य अंधकारमय …
Read More »ओबीसी आरक्षणप्रश्नी सरकारचा मोठा निर्णय: या कायद्यात करणार दुरूस्ती राज्य मंत्रिमंडळात अध्यादेश काढण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्या पाच जिल्हा परिषदा आणि रिक्त पंचायती जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र आज भाजपाने केलेल्या राज्यभरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडीची पिछेहाट होवू नये यासाठी आता नव्याने अध्यादेश काढण्यास आणि निवडणूका पुढे ढकलण्याबाबतच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत मंजूरी …
Read More »आमचे पोलिस काय करत होते? भाजपा नेते अॅड.आशिष शेलार यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत येऊन दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जान मोहम्मद शेख याला अटक केल्याच्या घटनेनंतर भाजपाने राज्याचे गृहमंत्री आणि पोलिसांवर निशाणा साधत हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलिस काय करत होते? असा सवाल भाजपा नेते …
Read More »ओबीसी आरक्षणप्रश्नी ही तर भाजपाची नौटंकी, पाप झाकता येणार नाही मोदी व फडणवीसच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी त्यांच्याविरोधात आंदोलन करावे-नाना पटोले
मुंबई : प्रतिनिधी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील भारतीय जनता पक्ष करत असलेले आंदोलन ही नौटंकी आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्राच नाही तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. आंदोलनाची नौटंकी …
Read More »सरकार जे बोलतं ते कृतीत दिसत नाही देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा
नागपूर: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणप्रश्नावर आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय सर्व पक्षियांच्या उपस्थित राज्य सरकारने घेतला. मात्र आता निवडणुका लागल्या आहेत, तर त्याला आम्ही सामोरं जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठं दिसत नाही असे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »भाजपाच्या टीकेनंतरही नीती आयोगाने केले कौतुक : मुंबईसह या प्रश्नी आश्वासन केंद्राकडील राज्याच्या प्रलंबित विषयांना त्वरेने मार्गी लावणार
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या २ ऱ्या लाटेनंतर संभावित ३ ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने काही निर्बंध राज्यातील जनतेवर लादत अनेक गोष्टी खुल्या केल्या. मात्र या निर्बंधावरून भाजपा नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक नीती आयोगाने केले. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर आणण्यासाठी …
Read More »केवळ परप्रांतियच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? गुन्ह्यांवरून एखाद्या समाजाला टार्गेट करणे योग्य नाही
पुणे : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी परप्रांतियांना उद्देशून दिलेल्या आदेशाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आणि असे एखाद्या समाजाला लक्ष्य करणे योग्य नसल्याचे सांगत केवळ परप्रांतीयच गुन्हे करतात का? असा उलट सवाल त्यांनी केला. ते मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक …
Read More »
Marathi e-Batmya