Tag Archives: bjp

राहुल गांधी यांच्या आरोपानंतर हरदीप सिंग पुरी यांचा खुलासा, होय मी एपस्टाईनला भेटलो पण आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी राहुल गांधी यांनी कुप्रसिद्ध एपस्टाईन फाइल्सशी त्यांचा संबंध जोडल्याच्या आरोपांना खोडून काढले आणि आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या (आयपीआय) शिष्टमंडळाचा भाग म्हणून लैंगिक गुन्हेगाराला भेटल्याचा खुलासा केला. राहुल गांधींच्या स्फोटक लोकसभेतील भाषणानंतर पत्रकार परिषद घेत मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टीकरण दिले. हरदीप सिंग पुरी …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, लाज वाटली पाहिजे, भारत विकला अर्थसंकल्पावरील भाषणा दरम्यान संसदेत पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका-भारत व्यापार करारावरून साधला निशाणा

लोकसभेत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर अमेरिकेसोबतच्या नुकत्याच झालेल्या व्यापार करारावरून हल्ला चढवला आणि सरकारला याची लाज वाटली पाहिजे असे म्हटले. त्यावर तीव्र हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले की, केंद्राने “भारत विकला”, तसेच अमेरिकन वस्तूंना प्रवेश देऊन सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान …

Read More »

चंद्रपूरात भाजपाच्या महापौराला शिवसेना उबाठाचा पाठिंबा भाजपाशी अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना उबाठाने केली युती

राज्यात आणि देशात भाजपाच्या घंटा बडवणारे हिंदूत्ववादावरून आणि राजकिय हेवेदाव्यातून शिवसेना उबाठा आणि भाजपाची २५ वर्षाची युती तुटली. त्यानंतर भाजपा आणि शिवसेना उबाठा या दोघांमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला. मात्र चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पक्षातच सत्तेपूर्वीच दोन गटात संघर्ष सुरु झाला. त्यामुळे भाजपाने या संधीचा फायदा घेत थेट शिवसेना उबाठाशी आणि …

Read More »

रविंद्र चव्हाण म्हणाले, महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर केले प्रतिपादन

१२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यभरात क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, या निकालांमधून भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे. १२ जिल्हा परिषदांपैकी सर्व ठिकाणी भाजपा आणि महायुतीचीच सत्ता येणार असून १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा अधिक ठिकाणी भाजपा सत्ता स्थापन करेल, असे प्रतिपादन भारतीय …

Read More »

साताऱ्यात मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड, मतदारांचा घराणेशाहीला स्पष्ट नकार मंत्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांच्या गडाला धक्का

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. प्रस्थापित नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना घरी धाडून मतदारांनी विकासाला आणि नव्या चेहऱ्यांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मंत्री मकरंद पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला असून, महाबळेश्वरच्या तळदेव गटात शिवसेनेच्या (शिंदे गट) अजित …

Read More »

मंत्री जयकुमार गोरे यांच्या बंधूचा निवडणूकीत पराभव, पण वहिनीचा विजय ठरला चर्चेचा? मनिषा फडतरे यांच्या विजयावर आक्षेप घेत पुर्न मतमोजणी घेण्यात आली त्यानंतर भारती गोरे विजयी

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५  पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी एका बाजूला महायुतीला दिलासा मिळाल्याचे चित्र असले तरी दुसऱ्याबाजूला मात्र अनेक भाजपाच्या मंत्र्यांच्या गडाला चांगलेच हादरे बसल्याचे दिसून आले. त्यापैकीच एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत मंत्री जयकुमार गोरे यांना हादरा बसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जयकुमार गोरे …

Read More »

मुंबईच्या महापौरसाठी भाजपाच्या रितू तावडे तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दोन्ही उमेदवारांचेच अर्ज दाखल

मुंबईत ठाकरे यांचे २५ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणत भाजपा मुंबईमध्ये आपले पहिले महापौरपद भूषवण्यास सज्ज आहे. शनिवारी (७ फेब्रुवारी २०२६) पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे यांनी सर्वोच्च पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील भगव्या पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा, …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले पण भाजपाच्या दुबेला मात्र मोकळीक पंडित नेहरु, इंदिरा गांधींबद्दल अश्लील शब्द वापरून बदनामी करणाऱ्या भाजपा खासदार निशिकांत दुबेला निलंबित करा

लोकसभेतील कामकाज बंद पाडण्यात सत्ताधारी पक्षच आघाडीवर आहे. विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, त्यांचे माईक बंद केले जातात. सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम आणि विरोधकांसाठी वेगळे नियम आहेत असे चित्र आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सातत्याने बोलण्यापासून रोखत होते, त्यांचा माईक बंद करत होते. पण भाजपा खासदार …

Read More »

प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, एपस्टीन फाईलला घाबरले? लोकसभा कामकाजातून मोदी यांची उपस्थिती झाली कमी

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा कामकाजातील अनुपस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सरकार टाळत आहे का, असा सवाल केला. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत राहुल गांधी यांना ‘भोळे’ म्हटल्याबद्दल प्रतिक्रिया देताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, विरोधी पक्षनेत्याला …

Read More »

संजय राऊत यांचे टीकास्त्र, राष्ट्रवादीच्या त्या दोन नेत्यांचे पाय भाजपात पक्षफुटी पूर्वी सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर सर्वाधिक गुन्हे

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा सध्या संपूर्ण राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असती, तर मित्र पक्ष म्हणून अजित पवार यांनी भाजपाला नक्कीच माहिती दिली असती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले …

Read More »