Tag Archives: bmc election

मुंबईत ठाकरे बंधूंना, तर पुण्यात पवार काका-पुतण्याला भाजपाचा धक्का काटे की टक्कर देत मुंबई आणि पुण्यात भाजपाने सत्तेची दारं स्वतःसाठी उघडली

साधारणतः आठ ते नऊ वर्षानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारी रोजी मतदान घेतले. त्यानंतर आज या सर्व निवडणूकांचे निकाल आज जाहिर होत आहेत. मागील १० ते १५ वर्षापासून मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपाला अखेर यश …

Read More »

भूषण गगराणी यांची माहिती, मुंबईची मतमोजणी निकाल उशीराने २३ मतमोजणी कक्षात उद्या सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत आज ( १५ जानेवारी २०२६) झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्‍या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी …

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मक रीत्या त्याचा वापर केला जाईल, …

Read More »

पवन खेरा यांचा सवाल, देशात बांग्लादेशी घुसखोर आहेत तर मोदी शाह काय करतात मुंबईला भाजपाकडून धोका, किती दिवस मुंबईचा पैसा, जमीन व उद्योग गुजराती मित्राला देणार

भारतीय जनता पक्ष महायुती मुंबईतील जमीन, उद्योग व पैसा मोठ्या प्रमाणात एका गुजराती मित्राला देत आहेत, हा मुंबई व मुंबईकरांशी मोठा धोका आहे. मुंबई ही गुजरातच्या मित्रासाठी आहे का, याचे उत्तर महायुतीला द्यावे लागेल. मुंबईतील जमिनी विकून भाजपा शिदेंसेनेने अमाप पैसा जमवला आहे. मुंबईत आता परिवर्तनची गरज असून मुंबईशी धोका …

Read More »

वंचित बहुजन आघाडीचा ‘लोकसंकल्प’ जाहीरनामा प्रसिद्ध 'राजगृह' येथून घुमला उपेक्षितांचा आवाज; प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते केले प्रकाशन

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. गुरुवारी, ८ जानेवारी रोजी दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ निवासस्थानी पक्षाचा अधिकृत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ‘लोकआवाज, लोकसंकल्प, लोकशक्ती’ असे ब्रीदवाक्य असलेल्या या जाहीरनाम्यातून मुंबईतील सामान्य आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनामा प्रकाशनावेळी सुनिल तटकरे म्हणाले, मुंबईकरांनी सहकार्य करावे जनसहभागासह मुंबईकरांचे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रिसूत्रीनुसार शहरात सलोखा राखणार

आम्हाला आमच्या मर्यादेची…शक्तीस्थळाची कल्पना आहे… तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने …

Read More »

आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) हे कार्यालय बुधवार, १४ जानेवारी २०२६ आणि गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कोणतेही नियमित कामकाज होणार नाही, अशी माहिती परिवहन विभागामार्फत देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पंचायत …

Read More »

रामदास आठवले यांच्या रिपाईकडून ३९ उमेदवारांची यादी जाहिर; प्रविण दरेकर भेटणार आठवलेंना मुख्यमंत्री फडणवीस रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार

नुकतेच मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीबाबत जागा वाटपाच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत भाजपाकडे किमान १६ जागा मागितल्या. परंतु भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार असल्याचे जाहिर केले. मात्र आज रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्यावतीने ३९ …

Read More »

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ९४ उमेदवार मुंबई पालिका निवडणूकीत ९४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार ;लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३० उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण ९४ जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज तिसरी व अंतिम उमेदवार …

Read More »

मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल- सुधीर जाधव पती पत्नीचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या – मनसे माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी सोमवारी (ता.२९) आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनामध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी पार पडला. या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी स्नेहल व सुधीर जाधव …

Read More »