Tag Archives: chief electoral officer

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांचा सन्मान निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव

निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना आज नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन केल्याबद्दल निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि राज्यांना विविध श्रेणीत विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, राज्यात ७५ लाख मते कशी वाढली? वंचितने पाठवलेल्या पत्राला आरओकडून सरकारी उत्तर

ईव्हीएम EVM संदर्भात आम्ही सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ईव्हीएम EVM संदर्भात एक बैठक बोलवणार आहोत. आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांशी आणि आर. ओ. यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्तांनी अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाही. काही आर. ओ यांनी सरकारी उत्तरे दिली आहेत. पण ७५ लाख मते कशी वाढली …

Read More »

भारत निवडणूक आयोगातर्फे मीडिया पुरस्कार-२०२४ साठी प्रस्ताव सादर करा आयोगाकडून प्रसार माध्यमांना आवाहन

राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन २०२४ मध्ये मतदार साक्षरता व जनजागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये चार वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रीत (प्रिंट मीडिया), टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक), रेडीओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाइन (इंटरनेट)/सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट प्रचारासाठी पुरस्कार या चार …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल,.. मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव का केला ? पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच

विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे आयोगाच्या निष्पक्ष व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; लोकशाहीसाठी धोक्याची घंटा

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे …

Read More »

नाना पटोले यांचे निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र फार्म १७ सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता व अंतिम निकालाची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित द्या

मतदान दिनीचा फार्म १७ सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता (परिशिष्ट-५७) व अंतिम निकाल (फार्म-२०) पडताळणी साठी याची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी करणारे फार्म १७ सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता व अंतिम निकालाची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित द्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मतदारसंघात वसतिगृहातील विद्यार्थ्यानाच बनविले मतदार काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्याकडून विद्यार्थी मतदारांची मतदान केंद्रावरच तपासणी

विधानसभा निवडणूकीची घोषणा जाहिर झाल्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीची आणि त्यांच्या रणनीतीची चर्चा अहमदनगरसह संपूर्ण राज्यात सुरु झाली. त्यातच काँग्रेसकडून प्रभावती घोगरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रभावती घोगरे विरूद्ध राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात सामना सुरुवातीला एककल्ली वाटत होता. मात्र आज …

Read More »

विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान अनेक जिल्ह्यात वाद, भांडणे आणि बोगस मतदानाच्या तक्रारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. मात्र यंदाची विधानसभा मतदानाचा दिवस हा राज्याच्या विविध जिल्ह्यात दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांची भांडणे, समर्थक आणि बोगस मतदानाच्या तक्रारीमुळे आज मतदानाचा दिवस थंडीच्या पाऱ्यातही चांगलाच गरम राहिला. तर …

Read More »

मतदानासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी तैनात आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात ५३२ एफ. आय. आर.

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४’ अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावी, यासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल,…निवडणूक आयोग काय झोपला आहे का? भाजपा युतीकडून साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर, प्रचार संपल्यानंतरही भाजपा नेते विरारमध्ये काय करत होते

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत. सर्वात आश्चर्याची व गंभीर बाब म्हणजे हे सर्व घडत असताना पोलीस दल व निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का? असा सवाल करून भाजपा नेते विनोद …

Read More »