Tag Archives: chief minister

२ च दिवसात देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे वक्तव्य आठवेना, आदित्य ठाकरे राहिले बघत आदित्य ठाकरे उभे राहिले, पण देवेंद्र फडणवीस यांनी केले पूर्ण दुर्लक्ष

राज्यात नव्याने स्थानपन्न झालेल्या महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी झाला. त्यानंतर संध्याकाळी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. तसेच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राची राजकिय संस्कृती वेगळी असून राज्यातील राजकिय परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांनी भूमिका घ्यावी …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकिय निवासस्थान आता वर्षा बंगला, तर… मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान म्हणून सागर बंगला?

राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरील असे मिळून तिघांचा शपथविधी नुकताच पार पडला. परंतु मागील अनेक दशकांपासून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा वर्षा बंगला मात्र यापुढे मुख्यमंत्र्यांचा बंगला नव्हे तर उपमुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ओळखला जाणार असून विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री म्हणून रहात असलेला सागर बंगला मात्र …

Read More »

राज्यपाल म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा आणि जातीमुक्त समाजनिर्मिती… परिवहन दिनानिमित्त आयोजित आदरांजली सभेत बोलताना व्यक्त केला निर्धार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बदल्यांचे नव्हे तर बदल करण्याचे राजकारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार

राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यावेळचे राजकारण खूप वेगळे राहणार आहे. मला बदल्यांचे नाही तर बदल घडविण्याचे राजकारण करायचे असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना देवेंद्र …

Read More »

मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची शासकिय फाईलीवर सही पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री पदाचा शपथ विधीः नवरदेवाचा पत्ता नाही, पण लग्नाच्या वरातीची तयारी जोरात मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात

राज्यात संशयातीत बहुमत मिळवत राज्यात सत्तास्थानी विराजमान होण्यासाठी भाजपा प्रणित महायुतीकडून शपथ विधी सोहळ्यासाठी जोराची तयारी सुरु झाली आहे. त्यातच आझाद मैदानापासून ते शपथविधी सोहळ्यासाठी कोण कोण हजर राहणार याची एक यादी आणि या सोहल्यासाठी किती लोक हजर राहु शकतील याची यादी भाजपाने तयार केली आहे. मात्र ज्या सोहळ्यासाठी भाजपाकडून …

Read More »

काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखाची मदत जिल्हाधिकाऱ्यांना जखमींवर उपचार करण्याच्या सूचना

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता …

Read More »

भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी महिला आमदाराच्या नावाची चर्चा तर शिंदे यांना विरोध करण्यासाठी मुख्यमंत्री पद डोंबिवलीतील आमदाराकडे

राज्यातील विधानसभा निवडणूकीत संशयातीत पाशवी बहुमत महायुतीला मिळाले. विधानसभेचा निकाल जाहिर होऊन आज जवळपास चार दिवस झाले. परंतु भाजपा आणि महायुतीकडून अद्याप मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले नाही. तर अनेक राजकिय जाणकारांच्या मते मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र वास्तविक पाहता …

Read More »

एकनाथ शिंदे बनले काळजीवाहू मुख्यमंत्री, संशयातीत बहुमतानंतरही अद्याप चर्चाच नियमानुसार विद्यमान राज्य मंत्रिमडळाने दिला राजीनामा

विद्यमान विधानसभेची मुदत संपत आली आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणूकीशी संबधित प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यानुसार आज मंत्रिमंडळाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सीपी राधाकृष्णन …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा मविआचे चांदिवलीचे उमेदवार नसीन खान यांच्या मुख्य पोलींग एजंटची निवडणूक आयोगाकडे तक्रार

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा …

Read More »