एखाद्या व्यक्तीने जर देशाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात जर कोणी अवमानकारक टीपण्णी केली असेल तर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई सरकारने करायला हवी. मात्र सांगली येथील भिडे हा राष्ट्रपित्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य करूनही त्याच्यावर राज्य सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. तो व्यक्ती अद्याप बाहेर कसा ? …
Read More »काँग्रेसने दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरविल्याची जाहिरात मणिपूर प्रश्नी कोणी प्रश्न विचारू नये
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन पाच ते सहा दिवस झाले आहेत. या कालावधीत काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकिय विरोधी पक्षांकडून मणिपूर मधील हिंसाचार प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं अशी मागणी करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीतच चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र मणिपूरसह इतर काँग्रेस शासित राज्यात महिलांवर …
Read More »नाना पटोले यांची मागणी, सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवा सेतू कार्यालये अद्ययावत करण्यासाठी शासनाचे धोरण काय?
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले सेतू कार्यालयातून घ्यावे लागतात. ही सेतू कार्यालये जनतेच्या सुविधांसाठी आहेत परंतु या सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची सर्रास लूट केली जात आहे. १५ ते २० रुपयांच्या दाखल्यासाठी २०० ते ३०० रुपये घेतले जातात, जनतेची होणारी ही लूट सरकारने थांबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती
महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. सदस्य दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री तानाजी सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नका शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालून भ्रष्टाचारमुक्त करा
मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे, पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे ही काँग्रेस …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, सावित्रीबाई यांच्याविरोधात लिखाण करणारे आरोपी कसे सापडत नाहीत? सरकारची भूमिका संशयास्पद; विरोधकांचा सभात्याग
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण एका संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले होते. त्यावर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र आतापर्यंत ते आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकावरही कारवाई का कऱण्यात आली नाही असा सवाल विधानसभेत उपस्थित केला. यावेळी …
Read More »सतेज पाटील यांचा इशारा, अलमट्टीतील पाणी सोडायला लावा अन्यथा, कोल्हापूर-सांगली… पूर उपाययोजनाबाबत दोन्ही राज्यांमध्ये तातडीने मंत्री स्तरीय बैठक घ्यावी
धरण क्षेत्रात असलेल्या पावसाच्या जोरामुळे कोल्हापूर, सांगली परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकची मंत्री स्तरीय बैठक तातडीने आयोजित करावी आणि अलमट्टी धरणाचा विसर्ग १ लाख क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, काँग्रेस आमदारांना दोन दिवसांत विकास निधी द्या अन्यथा… मुंबई महापालिकेतील भाजपाच्या पालकमंत्र्यांचे कार्यालय हटवा
आमदारांना विकास निधी देताना काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर अन्याय झालेला आहे. विकास निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त प्रमाणात वाटण्यात आला आहे तर काँग्रेसच्या आमदारांना अत्यंत कमी निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना निधीचे वाटपही झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदारांना विकास निधी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विकास …
Read More »आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यूः फडणवीस म्हणाले, एखाद्या पेपरच्या बातमीवर इथे… काँग्रेससह विरोधकांचा सभात्याग
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात होऊन जवळपास १० दिवस झाले. या १० दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. त्यातच अधिवेशनाच्या तोंडावर इर्शाळगड येथे दरड कोसळून दुर्घटना घडली. त्यावरून पहिल्या आठवड्यात इर्शाळगड दुर्घटनेसंदर्भातील चर्चा विधानसभेत पाहायला मिळाली. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच पुरवणी मागण्यांमधील निधी वाटपाचा मुद्दा चर्चेत आला. या …
Read More »नाना पटोले यांच्या कंत्राटी मंत्रीच्या टोल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही येता का? विधानसभेतील कामकाजात आमदारांच्या प्रश्नांना मिळणार वेळ आणि न्याय
विधानसभा सभागृहात प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी आणि विधेयकावरील चर्चा आदी मुद्यावर किती वेळ आमदारांनी बोललं पाहिजे यावरून भाजपाचे योगेश सागर, शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी मत मांडले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपले मत मांडताना उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इशारा करत कंत्राटी मंत्री सध्या असल्याची टीपण्णी …
Read More »
Marathi e-Batmya