अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात कटूता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र राजकारणात कटूता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. कटुता असेल तर ती सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी देखील करेन. पण एक चांगले आहे की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही …
Read More »जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
राज्यातील आठ जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तरित्या महिन्याभरात धोरण तयार करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती कंपनीद्वारे नवीन जलविद्युत प्रकल्प उभारणे, जुन्या जलविद्युत प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याबाबत आयोजित …
Read More »शिंदे गटाच्या आमदारांची मंजूर कामे भाजपाच्या मंत्र्याने रद्द केल्याने धुसफुस शिंदे फडणवीस सरकारमध्ये अंतर्गत धुसफुस वाढली
राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गट आणि भाजपाचे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. मंत्रिमंडळाचा विस्तार होताच शिंदे गटाच्या अनेक आमदारांमध्ये मंत्री पदावरून तर पालकमंत्री पदावरून तर आपला मूळ मतदार संघ बदल्यावरून नाराजी नाट्य रंगू लागले असताना आता या सरकारमध्ये विकास कामं रद्द करण्यावरून पुन्हा एकदा अंतर्गत …
Read More »शिंदे सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खुषखबर, दिवाळी अग्रिम मिळणार
दिवाळीला आता काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घालण्याच्या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीनिमित्त अग्रिम देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण उत्साहात साजरा होणार आहे. राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री …
Read More »जयंत पाटील म्हणाले, त्यांचा कारभार फक्त एक वर्षाचा…
महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले, ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र कपटाने सरकार पाडण्यात आले अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भुदरगड, …
Read More »नाना पटोले म्हणाले, ईडी सरकारचा तो निर्णय म्हणजे, ‘भीक नको पण कुत्रा आवर’
शासकीय खरेदी आधारभूत केंद्राअंतर्गत धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीच्या शासकीय निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ई-पीक पाहणी, सातबारासह शेतकऱ्यांची सर्व माहिती सरकारकडे असताना पुन्हा धान खरेदी केंद्रावर जाऊन ऑलनाईन नोंदणी करण्यास सांगणे हे गरिब, सामान्य शेतकऱ्यांचा छळ करणारे तसेच अन्यायकारी आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी …
Read More »महात्मा गांधी यांचे विचार कृतीत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप
सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठया जनांदोलनात परावर्तित केला. बापूजी सर्वसामान्य माणसाच्या सेवेला ईशसेवा – देशसेवा मानत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपित्याचे विचार कृतीत आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी जाणिवेने काम केले जात आहे म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रशासन नेमकं कोण चालविते ते देवालाच ज्ञात ओरबाडून सत्तेवर आलेलं सरकार
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येवून जवळपास तीन महिने झाले. मात्र या सरकारच्या कारभारावरून सातत्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने कधी राज्य सरकारच्या पालकमंत्री नियुक्तीवरून तर कधी राज्याच्या कारभारावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत असतात. सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्याचे …
Read More »अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय
अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक …
Read More »मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप
राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे. त्यातील ७८ उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विभागातील नियुक्तीपत्रे देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठक सभागृहात झालेल्या या …
Read More »
Marathi e-Batmya