Tag Archives: deputy chief minister

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादानेच आपल्याला शिवसेना हे नाव मिळाले

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री …

Read More »

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन मात्र आंदोलनकर्त्ये लेखी आश्वासनाच्या मागणीवर ठाम

राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र आंदोलनकर्त्ये लेखी आश्वासनावर ठाम असल्याने आंदोलन पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. मेघदूत शासकीय निवासस्थान येथे राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समिती यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. या …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून तर राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल …

Read More »

भाजपाही करणार मुख्यमंत्री शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम पण(?) घोटाळ्यातील दलाल आणि संबधितांचे कनेक्शन गोळा करण्याचे काम सुरु

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नंबर दोनचे नेते राहिलेले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार ते मागील आठ वर्षात नगरविकास मंत्री म्हणून काम करत असतानाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तींनी आणि समर्थकांनी केलेल्या कामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली असून त्यासाठी भाजपाची खास टीम …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचे आरोपानंतर माजी गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, असा आदेशच नव्हता काहीही करून मला अटक करण्याची सुपारी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिली होती

२०१९ साली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात स्थानापन्न झाले. मात्र या सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिंता निर्माण झाली …

Read More »

कोश्यारींच्या इच्छेनंतर दिल्लीत अमित शाहंनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पंकजा मुंडेही पोहोचल्या अमित शाहच्या कार्यालयात

एरवी एकाही वादग्रस्त घटनांबद्दल किंवा वक्तव्यावरून राजभवनाकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अनुषंगाने एकही प्रसिध्दी पत्रक जारी केले जात नाही. मात्र काल पहिल्यांदाज राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती आपण नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचे पत्रक राजभवनाकडून जारी करत शिंदे-फडणवीस सरकार स्थानपन्न झाल्यानंतरही पडद्यामागे सगळंच आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. …

Read More »

उध्दव ठाकरे गैरहजरः विधान मंडळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे तैलचित्र विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज बसविण्यात आले. या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे वगळता इतर ठाकरे कुटुंबिय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रगतीचं सरकार पण मोदींच्या मार्गदर्शनानुसार काम करतो… केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन होत असून यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजविले आहे. आजच्या लोकर्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत असताना महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकांची …

Read More »

BMC-MMRDA चे हजारो कोटींचे अर्थसंकल्प तर पंतप्रधानांचे निधी कमी न पडू देण्याचे आश्वासन वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मेट्रोसह अन्य विकास कामांचा शुमारंभ करताना दिले

मुंबईतील मेट्रो २ अ आणि ७ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत भविष्यकाळातील विकासासाठी मुंबईला तयार करण्याचे काम …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, काही लोकांनी बेईमानी केली… मोदींमुळे नवा टेंड्र सुरू त्यांनीच भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांचे मोदींनीच केले उद्घाटन

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे, मुंबई आणि नागपूरातील प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची चौथी वेळ आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांनी बेईमानी केली असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता करत त्यामुळेच राज्यात मागील अडीच वर्षात लोकांच्या मनातील …

Read More »