Tag Archives: devendra fadnavis

देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरेंना टोला, आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही… सर्व सण जोरात होणार असल्याचे केले जाहीर

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत या बंडास भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप केला. मात्र बंडखोर एकनाथ शिंदे हे जसजसे उध्दव ठाकरे यांना इशारा वजा विनंती करत गेले तसतसे उध्दव ठाकरे हे शांत झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला सेना नेते आदित्य …

Read More »

निमित्त दही हंडीचे, शिंदे गट- भाजपाकडून समिकरण मात्र महापालिका निवडणूकीचे गोविंदा पथकांना आकृष्ट करण्याकडे कल

राज्याच्या राजकारणात विशेषत: २०१४ साली सत्तेत आल्यापासून आणि विरोधात बसून पुन्हा सत्तेत विराजमान झालेल्या भाजपाकडून प्रत्येक गोष्ट ही निवडणूक प्रचार आणि मतदार वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे प्रत्येक सण आणि प्रत्येक गोष्ट ही इव्हेंट पध्दतीने करायची असा खाक्याच जणू भाजपाने स्विकारल्याचे दिसून येत आहे. …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपलं सरकार आल्यानंतर कसं वाटतंय मोकळं मोकळं… बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दही हंडी उत्सवात फडणवीसांचे भाषण

मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे दही हंडी साजरा करण्यात आला नव्हता. मात्र यंदा राज्यात सत्तांतर होत मुंबईसह १४ महापालिका निवडणूका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी दहीहंडीचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले. या प्रत्येक दही हंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दही हंडी …

Read More »

बोटीत शस्त्रास्त्र साडल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली ‘ही’ माहिती बोट वाऱ्याने हरिहरेश्वरच्या किनारी

आज श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट स्थानिकांना आढळून आली. स्थानिक रहिवाशांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बोटीची पाहणी केली असता, या बोटीत ३ एके-४७ रायफल आणि काडतूस तसेच बोटीची कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर तत्काळ हायअलर्ट जारी करण्यात आला. तसेच याची माहिती भारतीय …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी कटिबद्ध पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुणे मंडळ म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांना बढती, पण केंद्रीय मंत्री गडकरींना वगळले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून यादी जाहिर

महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिवसेनेतील बंडखोरांच्या मदतीने राज्यात भाजपाचे सरकार स्थापन केले. त्यामुळे एकाबाजूला केंद्रात देवेंद्र फडणवीस यांचे राजकिय वजन वाढलेले असल्याचे सांगण्यात येत असतानाच आता थेट फडणवीस यांचा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या समितीतून केंद्रीय …

Read More »

पावसाळी अधिवेशनाच्या १ ल्या दिवशी ‘या’ विभागांसाठी केली निधीची तरतूद २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या -सर्वाधिक निधी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाला

शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर पहिलेच असलेल्या पावसाळी अधिवेशनाला आज पासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ हजार ८२६.७२ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. या पुरवणी मागण्यांवर चर्चा होवून त्यानंतर मंजूर करण्यात येणार आहेत. मात्र यापैकी सर्वाधिक निधी राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागासाठी राखीव …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला वाटले अजित पवार अभ्यासू आहेत मात्र आता ते… अजित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या मदतीवरील वक्तव्यावरून केली टीका

आतापर्यत माझा असा समज आहे की अजित पवार हे फार अभ्यासू आहेत. अभ्यास केल्याशिवाय ते बोलत नाहीत. तसेच त्यांच्याकडील स्वीय सहायक जो आहे त्यावरून तरी दिसते. मात्र आता ते माझा विश्वास तोडत असल्यासारखे वाटते अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …

Read More »

नाराज मंत्र्यांच्या चर्चेवरून मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, आमच्यापैकी कुणीही… जाणीवपूर्वक वावड्या उठविल्या जातायेत

सत्ता स्थापनेनंतर तब्बल ३९ दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतरही ४ ते ५ दिवसांनंतर मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले. मात्र खाते वाटपानंतर दुय्यम दर्जाची खाती मिळाली म्हणून मंत्री दादाजी भुसे आणि संदिपान भुमरे यांनी अप्रत्यक्ष आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या खाते वाटपावरून विरोधकांकडूनही …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आवडीच्या गृह बरोबरच राज्याच्या तिजोरीच्या चाव्याही भाजपाच्या हिश्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार, विधि व न्याय

मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल चाल दिवसानंतर १८ मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहिर करण्यात आले. या खाते वाटपावर भाजपाचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणती खाती येणार याबाबत अटकळ बांधण्यात येत होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीचे खाते गृह आणि राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असलेले वित्त हे …

Read More »