पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत म्हणजेच पंधरवडापुरतेच मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जाहिरातीवरून माफी मागण्याची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत. …
Read More »मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छ. संभाजीनगर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अथकपणे काम करू
मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मिती, कृषि, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात अथकपणे काम करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात दिली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे ८ निर्णय विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता वाढविण्यापासून ते रिअॅलिटी धोरण २०२५ धोरणास मंजूरी
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या बैठकीत राज्याच्या आगामी धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ ला मंजुरी, महानिर्मिती-सतलज जलविद्युत निगमची संयुक्त कंपनी स्थापन होणार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ, आधुनिक …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन ‘जेम्स अँड ज्वेलरी’ अभ्यासक्रम सुरू करणार जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन
‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात विश्व स्तरावर नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता आहे. यासाठी राज्य शासन कौशल्य (स्किल) विद्यापीठ अंतर्गत ‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करेल. ज्यामुळे निश्चितच या क्षेत्राच्या प्रगतीत सातत्य कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजेनको – ‘एनएमआरडीए’मध्ये सामंजस्य करार कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्प
नागपूर महानगर क्षेत्रातील कोराडी (ता.कामठी) या ठिकाणी पर्यावरणीय पर्यटन स्थळ (ईको टुरिझम) विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजनको) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार
एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन २,३९९ उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. या एकत्रित योजनेच्या अंमलबजावणीच्या धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याकरीता …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ह्युंदाई कंपनीने अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे येथील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणुक करीत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत केले. ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू …
Read More »राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन
गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ …
Read More »
Marathi e-Batmya