मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या काळात राज्यातील नाभिक समाजाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून सुमारे २० लाख लोकांवर बेरोजगारीचे संकट आहे. त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील विविध नाभिक समाजातील संस्थांचे प्रतिनिधी तसेच राज्यातील सलून/वेलनेस उद्योगांतील प्रतिनिधींशी आज त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा …
Read More »राज्य सरकारची परिस्थिती ‘केवळ पॉलिसी’ नाही, तर ‘अॅक्शन पॅरालिसिस’ची चक्रीवादळग्रस्तांना १०० कोटींची मदत तुटपुंजी: देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी आपण ज्या घोषणा करतो, त्याप्रमाणे ते करतो का, याचा राज्य सरकारकडून विचार होणे आवश्यक आहे. ८० टक्के खाटा अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे केवळ सांगण्यात आले, पण रूग्णांना खाटा मिळत नाही, ही वास्तविकता आहे. राज्य सरकारची ‘पुनश्च हरिओम’ ही संकल्पना चांगली आणि ती आवश्यकच आहे. सुरूवातीला काही अडचणी येतील. …
Read More »१ मे रोजी राज्यातील एकूण चाचण्यांत मुंबई ५६ टक्के, तर ३१ मे ला २७ टक्के ? विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवित राज्यातील बळींच्या वाढत्या संख्येवर व्यक्त चिंता
मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र ५० टक्क्यांहून अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत आणि आता राज्यात कोरोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत आहे, याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून लक्ष वेधले आहे. मुंबईत मृत्यू …
Read More »काँग्रेसच्या सचिन सावंतांचे भाजप नेत्यांना खुल्या चर्चेसाठी आव्हान मोदीजींच्या जन्माआधीपासूनच रेल्वे सबसिडीमध्ये चालते, कोविडसाठी काय दिले? सवाल
मुंबई: प्रतिनिधी स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यातील सवलतीचा भाजपचा दावा खोटा ठरला असतानाही भाजपचे नेते ते मान्य करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयात सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांनीच त्यांचा हा खोटारडेपणा उघड करुनही त्यांची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच दिसते. आपला खोटेपणा उघड पडला की वैयक्तिक पातळीवर घसरण्याची भाजपाची खोड जुनीच …
Read More »“त्या” पुराला अलमट्टी नव्हे तर अतिवृष्टी आणि अतिक्रमण, बांधकामे जबाबदार वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर
मुंबई : प्रतिनिधी गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भाग आलेला पूर हा कर्नाटकातील अलमट्टी आणि हिपरग्गा जलाशयामुळे आलेला नसल्याचा अहवाल वडनेरे समितीने दिला असून या पुरास प्रामुख्याने नदीच्या परिसरातील पात्राचे संकुचिकरण, अतिवृष्टी याबरोबरच नागरीकरण, अतिक्रमण आणि बांधकामे जबाबदार असल्याचा ठपका या समितीने ठेवला. सदर अहवाल भविष्यकालीन उपायोजनासाठी नक्कीच उपयोगी …
Read More »विचार करावाच लागेल.. हिरे व्यवसायातलं कौशल्य एका दिवसात कसे मिळेल विरोधी पक्षनेते फडणवीसांचे जयंत पाटलांना उत्तर
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राच्या भूमिपूत्रांना स्थलांतरितांच्या जागेवर रोजगार मिळणार असेल तर त्याचे आपण स्वागतच केले आहे. पण, हे स्वागत करीत असताना त्यांना कौशल्ययुक्त करावे लागेल, ही गरज मी मांडली. उदाहरणार्थ बंगालचा कामगार हा मोठ्या प्रमाणात हिर्यांच्या व्यवसायात काम करतो. ते कौशल्य एक दिवसांत दुसर्याला मिळणार नाही, ते त्यांना शिकवावे लागेल, असे …
Read More »स्कील नाही, मग पंतप्रधान मोदींचा स्कील इंडिया कार्यक्रम बिनकामाचा का? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी परप्रांतीय मजुर राज्याबाहेर गेल्याने आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, महाराष्ट्रातील तरुणांमध्ये ते स्कील नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्कील इंडिया कार्यक्रम बिनकामाचा ठरला का? असा सवाल करत मराठी तरुणांचे मानसिक खच्चीकरण जाणीवपूर्वक करत असल्याची टीकाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील …
Read More »केंद्र सरकार राज्याचे पैसे देत नाही मात्र कोणतीही गोष्ट फुकट देत नाही शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी केंद्राकडे महाराष्ट्राचे ४२ हजार कोटी पडून आहेत. ते पैसे द्या म्हणून मागणी करतोय तर ते दिले जात नाहीत. ८० ट्रेन मागितले तर ३० ट्रेन दिल्या जातात. एक तास आधी ट्रेन उपलब्ध असल्याचे रेल्वेकडून सांगत नुसता गोंधळ निर्माणण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब करत …
Read More »कर्जबाजारी करण्याचा उद्योग केलेल्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक …
Read More »काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांना आव्हान विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्यक्ष खर्चाचे पॅकेज किती आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी सादर करावी
कराड : प्रतिनिधी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळाले असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच विविध योजने अंतर्गत महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचे विवरण त्यांनी दिले. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासविण्याचा प्रयत्न केला आहे की, महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत …
Read More »
Marathi e-Batmya