Tag Archives: devendra fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदानावरही विशेष लक्ष द्या 'एनसीआय'मध्ये 'ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स' परिषदेचे उद्घाटन

गेल्या दशकभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भारतासारख्या देशाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असली, तरी सध्या कर्करोग हा आरोग्य व्यवस्थेसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. ही समस्या केवळ भारतापर्यंत मर्यादित नसून जागतिक स्तरावरही तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदान यावरही विशेष …

Read More »

भायखळ्यातील मिल परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम उभारण्याला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्त रूप

भायखळा परिसरातील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिल जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईल, क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून विकसित होणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असून, या संदर्भातील सामंजस्य करार झाला आहे मुंबईच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक पुनरुत्थान साधण्याचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मेट्रो स्लॅब दुर्घटनेची जबाबदारी विकास पुरुष देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर

वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो- ४ या ग्रीन लाइनवरील मुलुंड मधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनने भाजपाच्या विकासाची पोलखोल केली आहे. मुलुंडच्या घटनेत एकाचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. युती सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार सुरु असून स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथीत विकास पुरुष मुख्यमंत्री …

Read More »

मुंबईत मेट्रोच्या पिलर्सचा भाग कोसळून अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी कारचे नुकसान, नुकसान आणि अपघाताची नुकसान भरपाई एमएमआरडीए देणार

मुंबईतील मुलुंड येथे शनिवारी दुपारी बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा एक भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. या घटनेत जवळच्या कारचाही काही भाग खराब झाला. जॉन्सन अँड जॉन्सन कारखान्याबाहेर, गजबजलेल्या एलबीएस रोडवर दुपारी १२.२० च्या सुमारास हा अपघात झाला. बांधकामादरम्यान सिमेंटच्या रचनेचा एक भाग खाली पडला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योगासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य जपानच्या वाकायामाचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांच्या भेटी दरम्यान दिले आश्वासन

महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत …

Read More »

आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, लॉजिस्टीक पार्क भिवंडीसाठी जाहिर करा अर्थसंकल्पामध्ये भिवंडीसाठी लॉजिस्टिक पार्कची घोषणा करावी

राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या गीग कामगारांना  सुविधा मिळण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक आणावे तसेच भिवंडीसाठी लॉजिस्टिक पार्क जाहीर करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात सोमवारी पत्र लिहिले आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, …

Read More »

भारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन कोस्टल रोडने प्रवास करताना जय हो गाणे ऐकायला मिळणार

मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी  रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या रस्त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डन …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरमध्ये होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम विकासवाडी येथील १२ हेक्टर ७६ आर जमीन देणार कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे विकासवाडी (ता. करवीर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडीयम उभारणी करण्यासाठी १२ हेक्टर ७६ आर इतकी शासकीय जमीन विनामुल्य देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शालेय शिक्षण व …

Read More »

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सांसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात  आला. विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री …

Read More »