महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना देण्यात येत आहे. राज्याच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून शहरी आणि ग्रामीण विकास अधिक गतिमान केला जात आहे. तसेच, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व– माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
मुंबई ही देशाची ‘एंटरटेनमेंट कॅपिटल’ आहे आणि याच शहरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’साठी जागतिक पातळीवर पुढाकार घेण्याची घोषणा केली होती. ती घोषणा आज यशस्वीरित्या प्रत्यक्षात उतरली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई येथे १ ते ४ मे २०२५ दरम्यान वेव्हज् परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, महायुतीचे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पंचनामा
हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सरकारला लगावला. जयंत पाटील पुढे म्हणाले की, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपण संबोधायचो. “पुणे तिथे काय उणे” …
Read More »अनिल परब यांचा गंभीर आरोप, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार मंत्र्याने तात्काळ राजीनामा द्या तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मी त्यांचे आरोप ऐकले नाहीत
विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला. तसेच राज्यातील सर्व डान्सबार बंद असताना हा एकमेव बार कसा सुरु असा सवाल करत या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान परिषदेत विचारले असता अनिल …
Read More »धमकीच्या मुद्यावर बोलू न देता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सगळे आमदार माजलेत असे… पडळकर-आव्हाड प्रकरणाच्या पडसादावरील चर्चेत बोलताना व्यक्त केली भूमिका
पडळकर-आव्हाड प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेत खेद व्यक्त करायला लावला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी या प्रकरणाशी संबधित आमदाराने धमकी दिल्याचा मुद्दा उपस्थित करताना भाजपाच्या सदस्यांनी आव्हाड यांना …
Read More »नाना पटोले यांचा विधानसभेत गौप्यस्फोट, मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचे केंद्र पेन ड्राईव्ह दाखवित मंत्री, अधिकारी गुंतल्याचा आरोप
मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहे. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे जेष्ठ आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी नाना पटोले यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला. काँग्रेस नेते नाना …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘ऑपरेशन मुस्कान’, ‘ऑपरेशन शोध’मुळे हजारो महिला आणि बालकांचा शोध महिला आणि मुलींच्या बेपत्ता प्रकरणांबाबत राज्य सरकारकडून गंभीरपणे दखल
राज्यातील बेपत्ता झालेल्या बालकांच्या, महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध सुरू केले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता बालके, मुली आणि महिलांचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्ष …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते टेस्ला शो रूमचे उद्घाटन; भारतात टेस्लाची अधिकृत एंट्री महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार
महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, …
Read More »सपा आमदार रईस शेख म्हणाले, महाराष्ट्रात ७५ लाख उर्दू भाषिक, पण लोकराज्य उर्दूत नाही आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला मुद्दा
राज्य शासनाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या उर्दू आवृत्तीचे प्रकाशन कोणत्याही कारणाविना बंद करण्यात आले असून समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. राज्यातील उर्दू भाषिकांना शासनाच्या योजनांची माहिती होण्यासाठी ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालया’ला (डीजीआयपीआर) ‘लोकराज्य’ची उर्दू आवृत्ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावेत, …
Read More »दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन
निवडणुकीत राज्याची तिजोरी रिकामी करणाऱ्या सरकारने आता महसूल वाढीसाठी १९७२ पासून बंदी असलेले मद्य परवाने देण्याचे लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करणाऱ्या दारु दुकाने परवाने देण्याच्या धोरणा विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. महायुती सरकारने मद्य परवाने देऊन जनजीवन विस्कळीत करणारे धोरण आखले आहे. सत्ताधारी पक्षांनी आपले …
Read More »
Marathi e-Batmya