भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे धार्मिक तेढ निर्माण करमारे विधान केले असून त्यांचे वक्तव्य भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वे व कायद्याच्या राज्याला उघड आव्हान देणारे आहे. संविधानाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे द्वेष पसरवण्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून एफआयआर FIR दाखल करा, अशी …
Read More »उद्धव, राज ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून भाजपाला भरली धडकी हिंदी भाषेच्या विरोधात दोन्ही ठाकरे एकत्र
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत. मराठी माणूस, मराठी भाषा यासाठी लढणारे ठाकरे बंधू मैदानात उतरत असताना भाजपाच्या मनात धडकी भरली आहे. आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये, म्हणून भाजपाने नवी रणनीती आखण्याची तयारी केली आहे. राज्यात पहिली पासून हिंदीची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात धोरण सादर करा दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, बृहन्मुंबई …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाजारमूल्य निश्चितीमुळे शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदा स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्या-टप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किंमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, पाच वर्षात २६ टक्के वीज दर कमी राज्य नियामक आयोगाच्या निकालानंतर दिली माहिती
राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये म्हणाले की, साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी ८६२ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर, थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा) विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी …
Read More »शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध मात्र राज्य मंत्रिमंडळाची मान्यता महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद
राज्यातील वर्धा ते सिंधुदूर्गला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आधीच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. तसेच काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या जमिनी द्यायच्या नाहीत असा निश्चिय असताना हा प्रकल्प काहीही करून पुर्ण करायचा असा चंग राज्य सरकारने बांधला आहे. त्यामुळेच आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या ई बैठकीत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला मंजूरी दिली. …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच मतांची भरघोस वाढ पाच महिन्यात मतदार यादीत ८ टक्के तर बुथवर २०-५० टक्के वाढ
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी आणि मतदानाच्या दिवशी एकूण मतदारांच्या संख्येत झालेली वाढ याबाबत एकूणच संशयकल्लोळ आहे. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकूण निवडणूकीच्या कामावरून आक्षेप घेत, संपूर्ण महाराष्ट्राची मतदारसंघ निहाय मतदार यादी आणि मतदानाच्या दिवशीची सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात न्यायालयात याचिका …
Read More »राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या अंमलबजावणीसाठी वॉररुम तयार करण्यात आली आहे. या वॉररुमच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन सामाजिक क्षेत्रातील योजना, उपक्रम व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तांत्रिक, विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक सहाय्य पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री कार्यालय आणि सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्स (सीईजीआयएस) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील वर्षा या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाबाबत बैठक
नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल़, असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत …
Read More »
Marathi e-Batmya