Tag Archives: farmers

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात… ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या

राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा …

Read More »

मकरंद जाधव-पाटील यांचे आदेश, अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा

राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब  सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले …

Read More »

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी

शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि कृषी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘सरकार भिकारी आहे’ मंत्रीच म्हणत… हा असंवेदनशिलतेचा कळस कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का?

महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय? असा प्रश्न पडला आहे. फडणविसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्या सोशल मिडीयावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

कांद्याचे घसरते दर आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्यायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, शासनाने शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये अशी विधानसभेत केली मागणी

नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये व  शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. यावेळी सभागृहात बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी, चंदवाडी येथील शेतकर्‍यांनी ६.५ किलोमीटर अंतरावरून वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी २.५ कोटी …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा

राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे,” असे उत्तर देतात. ज्या महाराष्ट्राने देशाला …

Read More »

जयकुमार रावल यांची माहिती, परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात खरेदीची परवानगी

बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणे अडचणीचे होत आहे. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार  राज्यात निदर्शनास येत आहेत.  त्यामुळे यापुढे बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना बंधनकारक करण्यात येणार आहे. परवाना असलेल्या व्यापाऱ्यांनाच संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येईल, असे पणन …

Read More »

शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या भूमापनाला शेतकऱ्यांचा विरोध शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आणि निदर्शने

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी (१ जुलै २०२५) रस्त्यावर निदर्शने केली आणि प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या भूमापनाला विरोध केला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राला गोव्याशी जोडणाऱ्या ८०२ किलोमीटरच्या ग्रीनफील्ड, प्रवेश-नियंत्रित, सहा-लेन कॉरिडॉरसाठी त्यांच्या सुपीक जमिनीच्या अधिग्रहणाबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २४ जून रोजी या प्रकल्पासाठी …

Read More »

नाना पटोले यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी लोणीकरांचे आणि भाजपाचे बाप, शेतकऱ्यांचे नाही शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी आमदारकी व आयुष्यही देऊ

भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप असेल आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही असा घणाघाती हल्ला करत शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन असे काँग्रेसचे …

Read More »