सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन आयकर विधेयक २०२५ चा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या संसदीय निवड समितीने नवीन विधेयकातील तरतुदी कायम ठेवल्या आहेत ज्यामुळे कर अधिकाऱ्यांना आवश्यक असल्यास, ते ज्या लोकांवर शोध आणि जप्तीची कारवाई करत आहेत त्यांच्या सोशल मीडिया आणि खाजगी ईमेलमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्यास सक्षम केले जाईल. आयकर विधेयक २०२५ …
Read More »नविन आयकर विधेयकावरील समितीच्या अहवाल सूचनांसह संसदेत सादर होणार २८५ सूचना समितीच्या अहवालात
नवीन आयकर विधेयक, २०२५ ची छाननी करणाऱ्या संसदीय समितीचा अहवाल सोमवारी लोकसभेत सादर केला जाणार असल्याने भारताच्या कर कायद्यात मोठा बदल होणार आहे. हे विधेयक सहा दशके जुने आयकर कायदा, १९६१ ऐवजी स्पष्टता, खटले कमी करणे आणि अनुपालन सुलभ करण्याच्या उद्देशाने एक सोपी चौकट आणण्याचा प्रयत्न करते. लोकसभेत १३ फेब्रुवारी …
Read More »रोहित पवार विधानसभेत म्हणाले, अजित पवार यांनी, अपनों को किया पराया निधी वाटपावरून लगावला टोला
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ५४ हजार कोटींच्या मागण्या सादर करण्यात अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केल्या. त्यावरील चर्चेला आजपासून सुरूवात करण्यात आली. यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बोलताना राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत-जामखेडला चांगला निधी येत होता. मात्र आता अजित पवार यांनी अपनो को किया पराया अशी स्थिती …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, राज्यावरील आर्थिक बोजा वाढला, आर्थिक संतुलन ढासळलं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांवरून सरकारला धरले धारेवर
राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारला पहिल्या दिवशी धारेवर धरले आहे. राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे, सरकारचे आर्थिक संतुलन ढासळलं आहे त्यामुळे राज्यातील गरिबांवर, …
Read More »अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी सादर केल्या ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कुंभमेळा, रस्ते, मेट्रो, सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती, मागास घटक विकासासाठी मागण्या सादर
विधिमंडळाच्या जून २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी …
Read More »कच्चा तेलाच्या किंमतीकडे अर्थमंत्रालयाचे लक्ष्य पर्यायी आयात मार्ग सुरक्षित करण्याकडेही कल
पश्चिम आशियातील वाढत्या तणावादरम्यान भारताचे अर्थ मंत्रालय कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याच्या व्यापक आर्थिक परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, अधिकारी तेल मंत्रालयाशी नियमित चर्चा करत आहेत, जे पर्यायी आयात मार्ग सुरक्षित करण्यासाठी आणि अखंड इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे. तेल मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की …
Read More »चौंडी विकास आराखड्यासाठी ६८१ कोटींच्या खर्चास अजित पवार यांच्या विभागाची मान्यता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यास मंजूरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासननिर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे. सदर आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची …
Read More »निर्मला सीतारामण यांचे आदेश, बँकानी अनपेक्षित परिस्थिला तोंड देण्यास सज्ज रहावे भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिले सर्व बँकांना आदेश
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्व बँकांना कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. “सर्व बँकांनी कोणत्याही परिस्थिती किंवा संकटाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सतर्क आणि सज्ज राहावे, नागरिक आणि व्यवसायांसाठी बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये अखंड प्रवेश सुनिश्चित करावा,” असे सीतारमण यांनी …
Read More »अर्थ विभागाची चालाकी, लाडक्या बहिणीतही आता जातीयवाद? आदिवासी आणि सामाजिक न्यायचा विभागाचा निधी त्याच समाजासाठी वापरणार असल्याचा जीआर जारी
देशातील ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आले. त्या राज्यात धार्मिक आणि जातीय समीकरण बिघडविण्याचे काम केले आहे. त्यात आता भाजपाला साथ देणाऱ्या त्यांच्या मित्र पक्षांकडूनही धार्मिक आणि जातीयवाद वाढीला हातभार लावण्याचे काम सुरु केले असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाटाची स्थिती असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि …
Read More »अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा विश्वास अमेरिकेबरोबरचा पहिला टप्पा सकारात्मक अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांची भेट घेणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी सांगितले की, भारताला या वर्षीच्या शरद ऋतूपर्यंत अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापार कराराचा (बीटीए) पहिला टप्पा ‘सकारात्मकरित्या पूर्ण’ होण्याची आशा आहे, ज्यामुळे शुल्क कमी करण्याच्या चर्चेत प्रगती दिसून येते. सॅन फ्रान्सिस्को येथून सहा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्याला सुरुवात करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण जागतिक बँक-आयएमएफ आणि जी२० बैठकांना उपस्थित …
Read More »
Marathi e-Batmya