महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या बंडखोरीमागे कोणते कारण आणि कशी झाली याबाबतचा खुलासा अद्याप होवू शकला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे बंडखोरी करणार असल्याचे माहिती त्यापूर्वीच थोरात यांना दिल्याचा …
Read More »नाना पटोले म्हणाले, …राजा कोण? याचे उत्तर जनतेने निवडणुकीतून दिले विधान परिषदेच्या विजयाची पुनरावृत्ती विधानसभा व लोकसभेत करु
विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेने धुळ चारली असून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला. नागपूर, अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपा उमेदवारांचा दणदणीत पराभव केला. तसेच औरंगाबादमध्ये मविआ उमेदवाराने विजय संपादन केला. खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही या निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. या निकालाने ‘प्रजा कोण आणि …
Read More »नाशिकमध्ये तांबे विजयाकडे तर अमरावतीत भाजपा पराभवाच्या छायेत, औरंगाबाद मविआकडे मविआकडे ३ तर भाजपा फक्त २ जागा परत मिळविण्यात यशस्वी
राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी झालेल्या मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महाविकास आघाडीने भाजपा-शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या नागपूर, अमरावती येथील जागा हिसकावून घेण्यात चांगल्यापैकी यश मिळविल्याचे दिसून येत आहे. तर नाशिकमध्ये भाजपाच्या पाठिब्यांवर लढत असलेले काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडीच्या …
Read More »जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या होम टर्फवरच… सत्तारुढ पक्षाच्या विरोधात महाराष्ट्र आहे हे समोर आले आहे...
जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद …
Read More »नागपूरातील पराभवानंतर भाजपाने मारली पलटी, ते भाजपा उमेदवार नव्हते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वादग्रस्त वक्तव्य
भाजपाच्या मातृसंस्थेचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारत भाजपा उमेदवार ना.गो.गाणार यांचा निम्याहून अधिक मतांच्या फरकाने पराभव करत काँग्रेसचे उमेदवार सुधाकर आडबले हे विजयी झाले. विशेष म्हणजे गाणार यांच्या प्रचारासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या. तरीही ना.गो.गाणार यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाने पलटी …
Read More »नाना पटोले म्हणाले, विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार पुण्यातील कसबा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ, ६ जण इच्छुक, उद्या मविआची बैठक
पिंपरी चिंचवड व पुण्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. दोन्ही मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून ६ उमेदवार इच्छुक आहेत. या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून महाविकास आघाडीच्या उदयाच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती …
Read More »मविआचा उमेदवार पराभवाच्या छायेत असताना अजित पवारांचे मोठे विधान सत्यजीत तांबेच निवडूण येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास
नाशिकमधील तांबे पिता-पुत्रांनी केलेल्या बंडाला भाजपाने दिलेली साथ आणि निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील या पराभवाच्या छायेत आहेत. तसेच निवडूण आल्यानंतर सत्यजीत तांबे हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाशिकच्या जागेवर सत्यजीत …
Read More »निवडणूकीच्या रिंगणात पहिल्यांदा जाहिर झालेल्या उमेदवाराची पहिली विजयी सलामी कोकण शिक्षक मतदार संघ शेकापकडून हिसकावून घेत भाजपा-शिंदे गटाने राखली
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी ३१ जानेवारी रोजी मतदान झाले. तसेच २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजता कोकणमधील शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडी-शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील आणि ठाकरे गटाने उमेदवारी दिली नाही म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत …
Read More »भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने मारली मुसंडीः आडबाले विजयी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील पराभवाचा काढला वचपा
आगामी राज्यातील मुंबईसह १४ महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. त्यातच नुकतेच सी व्होटरने जारी केलेल्या सर्व्हेक्षण अहवालातील अंदाजानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील तर भाजपा-शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर लगेच राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पाच जागांसाठी झालेल्या …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका, महाविकास आघाडी एक टोळी, घरोबा एकाबरोबर तर… शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडी उघडपणे पाठिंबा देत नसल्याचा आरोप
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी एक टोळी आहे. घरोबा एकाबरोबर करायचा आणि संसार दुसऱ्या व्यक्तीबरोबर करायचा, अशी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. …
Read More »
Marathi e-Batmya