एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २८ सप्टेंबर, २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र आता ही परीक्षा ९ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांच्या आत्महत्येस फडणवीस सरकारच जबाबदार… उदयन राजे भोसले बंच ऑफ थॉटवर गप्प का?
राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने निवडणुकीत जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला. लाडक्या बहिणी, एसटी कामगार व शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, अशा अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी जीवन संपवत आहे, हे महाराष्ट्रासाठी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, एमपीएससी परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप लागू करण्याचा निर्णय कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. २०२२ मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर २०२५ पासून तो लागू करण्याचे ठरवण्यात आले. आता तो मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सदस्य प्रवीण दरेकर यांनी …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मैत्रेयी जमदाडेचा सत्कार एमपीएससीच्या परिक्षेत मुलींमध्ये राज्यात अव्वल
सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ जयंती निमित्त सावित्रीमाई जयंती उत्सव घेण्यात येत आहे. या ठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यासाठी ‘महाज्योती’ने स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत २०२२-२३ वर्षात घेण्यात …
Read More »अतुल लोंढे यांचा इशारा, MPSC व IBPS च्या परीक्षा एकाच दिवशी, तारखा बदला अन्यथा… MPSC च्या आडमुठ्या भूमिकेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे.
MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग युवकांचे आयुष्य घडवणारे आहे की त्यांची कत्तल करणारा जनावरांसारखा कत्तलखाणा आहे. १८ व २५ ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवर परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच तारखांना MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा आयोजित केल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. MPSC एमपीएससीने परिक्षांच्या तारखांमध्ये बदल करुन दोन …
Read More »महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतुदीनुसार २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत,जाहिरात प्रसिद्ध होऊन …
Read More »MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यशः बदलेला अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्राद्वारे विनंती
MPSC परिक्षेसाठी यंदाच्यावर्षी पासून बदलेला अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला. त्या विरोधात एमपीएससी परिक्षार्थी विद्यार्थ्यांकडून अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारने अखेर बदलेला अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यासंदर्भातील विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात राज्य सरकारकडून जारी करण्यात …
Read More »MPSC प्रश्नी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन अन चंद्रकांत पाटलांवर निशाणा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक
महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यातील मोदी बागेतील घरी झाला. त्यानंतर शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक …
Read More »नाना पटोलेंचा सवाल, विद्यार्थ्यांच्या हितासाठी MPSC चा नवीन अभ्यासक्रम दोन वर्षांनंतर लागू करा हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यास भाजपाची नकारघंटा का?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून त्याची अंमलबजवणी पुढील वर्षापासून म्हणजे २०२३ पासून करण्याच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन नवीन पद्धत २०२३ पासून लागू करण्याऐवजी दोन वर्षांनंतर २०२५ पासून लागू करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पत्रकारांशी …
Read More »सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर
महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत असल्याची माहिती, महाराष्ट्र लोकसेवा …
Read More »
Marathi e-Batmya