Tag Archives: narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस हल्लाबोल, शाही परिवारासाठी एटीएम काँग्रेस व मित्रपक्षांच्या तोंडी पाकिस्तानची, विभाजनवाद्यांची भाषा

जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला सत्ता मिळताच तेथे कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. पाकिस्तान, विभाजनवादी शक्ती, अतिरेकी प्रवृत्ती आणि भारतविरोधी शक्ती ३७० रद्द करण्याची मागणी करतात, त्याचाच पाठपुरावा काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष करू लागले आहेत,असा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर देशविरोधी शक्तींच्या मागणीचा समर्थनाचा आरोप …

Read More »

नाना पटोले यांचा पलटवार,…मोदी-शाह यांचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही काँग्रेस संपली म्हणणाऱ्या मोदींच्या भाषणात ५० वेळा काँग्रेस नावाचा जप

विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पराभवाची चाहूल लागल्यानेच जाती व धर्माच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. जाती धर्माच्या उतरंडी ही मनुवादी भाजपाचीच संस्कृती आहे. जाती जातीत भांडणे लावण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले असून नरेंद्र मोदींनी त्याचे खापर काँग्रेसवर फोडू नये. छत्रपती …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही बटेंगे… चा पुढचा नारा “एक है तो सेफ है” धुळ्याच्या प्रचार सभेत दिला नारा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा आणि महायुतीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात केली. परंतु धुळ्यातील पहिल्याच जाहिरसभेत बोलताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा देत पुन्हा एकदा हिंदू मतांचे धुव्रीकरणाच्या धर्तीवर पुढचा नारा देत एक …

Read More »

मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये २४ टक्के पदे आजही रिक्त नागरी सेवा भरतीतून पदे भरलीच नाही

नवी दिल्ली वेतन आणि भत्त्यांवरील ताज्या वित्त मंत्रालयाच्या अहवालानुसार, १ मार्च २०२३ पर्यंत केंद्र सरकारमधील चारपैकी एक नागरी पद सलग तिसऱ्या वर्षी रिक्त होते. शिवाय, मंजूर पदांची संख्या कमी होत आहे. अहवालात असे दिसून आले आहे की ३१ मार्च २०२३ पर्यंत केंद्र सरकारमधील (UT सह) नागरी कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर संख्या …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचे भाकित, मविआच्य़ा विजयाने केंद्रात बदल घडेल सामाजिक न्याय खात्याला मंत्रीच नाही, आरक्षण संपविण्याचा डाव

मागास प्रवर्गाच्या सामाजिक उत्थानाच्या योजना बंद होत आहेत. ओबीसी एसटीएससी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद करणे. हा या सरकारचा एजेंडा असल्याचे सांगत राज्यातील महाविकास आघाडीचा विजय हा केंद्रातील सत्ता बदल ठरेल दोन महिन्यात त्याचे परिणाम दिसतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. राज्यातील महाविकास आघाडी …

Read More »

प्रियंका गांधी-वड्रा यांचा आरोप, पंतप्रधान मोदींचे सरकार केवळ श्रीमंत उद्योपतींसाठी काम करतय तर राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती प्रियांका गांधी यांच्या रूपाने सर्वोत्तम खासदार वायनाडला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केरळ मधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर करण्यात आली. या जागेसाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधी-वड्रा यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर भाजपाकडून नवीन हरिदास महिला उमेदवाराची घोषणा केली. पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी वायनाड येथे एका जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

नाना पटोले यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घाला कापूस आयातीचा निर्णय व्यापाऱ्यांच्या फायद्याचा, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित पहावे

कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची टीका, वास्तवात न उतरणारी आश्वासन देणारी काँग्रेस कर्नाटकातील सरकारकडून एक गॅरंटी कमी करण्याच्या चर्चेवर सोडले टीकास्त्र

कर्नाटकात विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसने जनतेला पाच आश्वासनांची गॅरंटी दिली होती. मात्र कर्नाटक उमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी पाच पैकी एक गॅरंटी बंद करण्याचे सुतोवाच दिले. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी “चुकीचा संदेश” दिल्याबद्दल कडक शब्दात कानउघाडणी केली. राज्य सरकारच्या महिलांसाठी मोफत …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन वयाच्या ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक सल्लागर समितीचे अध्यक्ष आणि पुणे येथील गोखले आर्थिक आणि राजकिय इन्स्टीट्युटचे माजी कुलपती बिबेक देबरॉय यांचे आज निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी ६९ वय होते. त्यांनी मोदी यांना दिलेल्या आर्थिक सल्ल्यामुळे बिबेक देबरॉय याना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर अजित रानडे यांची कुलपती पदावरून हकालपट्टी …

Read More »

रशियाला मदत केली म्हणून अमेरिकेचे भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध युक्रेश-रशिया युद्धात रशियाला मदत केल्याचा ठपका

युक्रेनमधील रशियाच्या युद्धाच्या प्रयत्नांना कथित समर्थन केल्याबद्दल निर्बंधांना सामोरे जाणाऱ्या जवळपास ४०० जागतिक संस्थांच्या यादीत युनायटेड स्टेट्सने १९ भारतीय खाजगी कंपन्या आणि दोन भारतीय नागरिकांचा समावेश केला आहे, ज्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणावाचा नवीन मुद्दा निर्माण झाला आहे. ही अलीकडील कारवाई, ज्याचा उद्देश रशियाला निर्बंध चुकवण्याद्वारे मदत केल्याचा आरोप असलेल्या संस्थांना …

Read More »