Tag Archives: NCP-Sharadchandra Pawar

भाजपाच्या प्रवक्त्या आरती साठे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशःकाँग्रेस-राष्ट्रवादीची टीका हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, आता न्यायपालिकेतही भाजपाचा थेट प्रवेश

लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा …

Read More »

केशव उपाध्ये यांचा सवाल. हिंदूंना बदनाम करण्याच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ? पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांवरून केला सवाल

भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले असल्याची टीका  प्रदेश …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांची टीका, सनातन धर्माने भारताला उद्धवस्त केले समाज सुधारकांना बदनाम करण्यात सनातन धर्मच जबाबदार

सनातन धर्माने भारताला उद्ध्वस्त केले आहे. सनातन धर्म नावाचा धर्म कधीच नव्हता. आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी आहोत, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारण्यासाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी सनातन धर्म जबाबदार आहे. …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, सातत्याने क्राइम वाढतोय, लोकांना वर्दीची भिती नाही पुणे आणि बीडमधील परिस्थिती सारखीच

महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने क्राइम वाढतोय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा, १४ हजार पुरुषांना लाभ लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा

महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे? १४ हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती छाननीमध्ये समोर आली आहे. प्रस्तुत घोटाळ्यासाठी संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असून, या घोटाळ्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे …

Read More »

पुण्यात रेव्ह पार्टीः एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक पहाटे ३.३० वाजता पुणे पोलिसांची कारवाई, काही महिला आणि पुरुषांना अटक

मागील काही वर्षात राज्यात ड्रग्ज आणि अमली पदार्थाचा वापर राज्यातील तरूणाईंमध्ये वाढल्याच्या चर्चा वाढीस लागल्यानंतर आता हनी ट्रॅपचे प्रकारही वाढत असल्याचा मुद्दा नुकताच झालेल्या पावसाळी अधिवेशात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून ही याच प्रकारचे आरोप भाजपाचे नेते तथा …

Read More »

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमीत मग्न, टीकेचा भडिमार नव्या वादाला माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा तोंड फोडले

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात विधानसभेचे कामकाज सुरु असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईल फोनवर ऑनलाइन रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा नव्या वादात सापडले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, महायुतीचे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पंचनामा

हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सरकारला लगावला. जयंत पाटील पुढे म्हणाले की, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपण संबोधायचो. “पुणे तिथे काय उणे” …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, कोणाच्या हातात दिलात महाराष्ट्र ? भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया

काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?’ असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड …

Read More »

केंद्रा नंतर राज्यातही भाजपाची दांडगाई, विरोधी आमदार समर्थकाला मारहाण भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकाला मारहाण

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या सांसदीय राजकारणात विशेषतः विधिमंडळात कितीही टोकाची एकमेकांवर टीका केली किंवा शाब्दिक हल्ले चढवले. तरी राज्याच्या राजकारणात शाररीक दृष्ट्या एकमेकांवर हल्ला करण्याचे काम आता पर्यंत कोणत्याही राजकिय पक्षाच्या आमदाराने विधिमंडळाच्या आवारात कधी केले नाही. पण केंद्रातील शासकिय यंत्रणांचा गैरवापर करत इतर राजकिय पक्षातील नेत्यांवर दादागिरी करणाऱ्या पंतप्रधान …

Read More »