Tag Archives: ncp

अजित पवारांचा टोला, काही नेते घोषणा करतात आणि घरात जावून बसतात अन्… मनसेप्रमुख राज ठाकरेंवर साधला निशाणा

मागील महिन्यापासून मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्षाची भूमिका स्विकारली. मात्र त्यांच्या आक्रमक भूमिकेचा सर्वाधिक फटका हिंदू धर्मियांच्या मंदिरांना आणि कार्यक्रमांना बसला. तरीही मनसे कडून मस्जिदींवरील भोंग्यावरून अद्यापही आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरेंवर पुन्हा एकदा …

Read More »

कोरेगांव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवारांनी दिली प्रदीर्घ साक्ष म्हणाले… भाषण करावे पण प्रक्षोभक नसावे

चार वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरेगांव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित बांधवांवर स्थानिक उच्च जातीतील व्यक्तींना हल्ला करत दंगल घडवून आणली. या प्रकरणी एनआयएकडून स्वतंत्र तपास सुरु असला तरी राज्य सरकारकडूनही याचा स्वतंत्र तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज आयोगाने साक्ष नोंदविली. ही साक्ष …

Read More »

राष्ट्रवादी म्हणते, राज ठाकरेंची उंची शरद पवारांच्या नखाऐवढी… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला

औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे कोणाला लक्ष्य करणार काय बोलणार याबाबतची उस्तुकता राजकिय वर्तुळात निर्माण झाली होती. मात्र राज ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर एका चकार शब्दाने न बोलता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाराष्ट्रातील जाती-पातींमध्ये द्वेषाचे राजकारण सुरु केल्याचा आरोप …

Read More »

माझे (स्व.बाळासाहेब) वडील भोळे होते, पण त्यांचे खपवून घेणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा भाजपाला इशारा

आता सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे उद्योग आणि गुंतवणूक मोठ्या पुन्हा येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे दृष्यपरिणामही दिसायला लागतील. महाविकास आघाडीची सारी सुत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातात असल्याबाबत आरोप करण्यात येत आहेत. कोणी काहीही आरोप करो. पण आमच्या सरकारचे उत्तम चालले आहे. शरद पवार हे वडीलधाऱ्यांप्रमाणे …

Read More »

गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार म्हणाले, संपूर्ण सरकार… कटेझरी येथील पोलीस इमारतीचे लोकार्पण;शौर्य स्थळाला भेट व सी-६० जवानांचा केला सन्मान

गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृहविभाग, अर्थ विभाग आहेच. परंतु संपूर्ण कॅबिनेट, संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, त्यांचे बंधु मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते… गुजरातचे कौतुक केले आता उत्तर प्रदेशचे करतायत

जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचं नाही असं ठरवलं असेल तर मग दुसर्‍या राज्याचे कौतुक ते करणारच असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. राज ठाकरे यांनी युपीचे कौतुक केले आहे असा प्रश्न …

Read More »

राणांच्या तक्रारीत वस्तुस्थिती नाही; लोकसभाध्यक्षांना राज्य सरकार माहिती देईल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

अटक करण्यात आल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर नैसर्गिक विधीसाठी शौचालय वापरू दिले नाही तसेच पिण्यासाठी पाणी दिले नसल्याचा आरोप करत आपणास जातीवाचक शिविगाळ केल्याचा गंभीर आरोप राणा यांनी केला. तसेच यासंदर्भात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रारही केली. मात्र मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी …

Read More »

शरद पवार म्हणाले, येणार म्हणून घोषणा केली पण आले नाहीत म्हणून अस्वस्थ माझेही सरकार बरखास्त केले होते पण मी किक्रेट सामन्याचा आनंद लुटला

राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन राजकारण चांगलेच तापलेले असताना राणा दांम्पत्यांनी केलेल्या राजकिय नाट्यानंतर भाजपाच्या नेत्याकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपासह, राणा दांम्पत्यांवर चांगलाच निशाणा साधला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय …

Read More »

सर्वांचा डिएनए एक आहे तर मागे राहिलेल्या लोकांच्या आरक्षणाला का विरोध कागलमध्ये पुन्हा एकदा मोठी सभा झालीय त्यामुळे राष्ट्रवादी मोठा पक्ष होईल याबद्दल शंका नाही - जयंत पाटील

पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहे. जनतेचे प्रश्न आहेतच. परंतु पवारसाहेबांच्या कृतीशील विचारांवर काम करतोय त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तीन लाखापेक्षा जास्त कार्यकर्त्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला. सर्व कार्यकर्त्यांना जोडणारा एकच धागा आहे तो म्हणजे पवारसाहेब आहेत. आज परिवार संवाद यात्रा संपली. कागलमध्ये सभा झालीय त्या त्यावेळी पक्षाचा मोठा …

Read More »

साहित्य संमेलनात शरद पवार म्हणाले, प्रोपागंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण शरद पवारांच्या हस्ते मराठी साहित्य समेलनाची सुरूवात

प्रोपागंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असून आपल्या देशात असाच विशिष्ट प्रोपागंडा पद्धतशीर पसरवला जात असल्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली. लातूरच्या उदगीर नगरीत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख …

Read More »