Tag Archives: ncp

या सरकारचं आता फार झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची टीका

नाशिकः प्रतिनिधी या सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही … मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार नाही. बळीराजाला सन्मानाने जगण्याची संधी भाजप सरकार देत नाही.या सरकारचं आता फार झालं… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला. महाआघाडीचे नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यावेळी ते बोलत होते. या …

Read More »

पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का ? भाजप नेते विनोद तावडे यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला. एका वृत्त वाहिनीवर मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, २००४ ला मनमोहनसिंग पंतप्रधान होतील. हे कोणाला वाटले नव्हते, कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहन …

Read More »

मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडीला जाहीर पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडी ला जाहीर पाठिंबा असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी घोषणा केली. यावेळी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष गुफरान अन्सारी, राष्ट्रीय प्रवक्ते मिरझा अब्दुल कय्युम नदवी, प्रदेशाध्यक्ष मुसा मुर्षद, महाराष्ट्र युवा …

Read More »

कुणी कळ काढली तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भाजपला इशारा

उस्मानाबाद – उमरगा: प्रतिनिधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतून आलो आहोत. कुणाची कळ काढत नाही परंतु कुणी कळ काढली तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना दिला. उस्मानाबादचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार यांनी मोदींवर …

Read More »

होर्डींग्जसाठी ५ लाखांचा हप्ता घेणारा ‘अविचारी’ खासदार कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

ठाणे : प्रतिनिधी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून ते एका बाजूला कलले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन न केल्यामुळे हे होर्डींग्ज बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे. मात्र, ठाण्यातील चार खासदारांपैकी एका खासदाराने या होर्डींग्जच्या उभारणीसाठी पाच लाखांचा हप्ता घेतला आहे. ठाणेकरांच्या …

Read More »

सोशल मिडीया बनले प्रचाराचे अड्डे ट्वीटर, फेसबुकवर फोटो आणि व्हीडीओंचा पाऊस

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित आघाडी या पक्षांकडून सोशल मिडीयावरील ट्वीटर, फेसबुक आणि व्हॉट्सअँपवरूनच एकमेकांवरोधात टीका टिपण्णी करत असल्याने सोशल मिडीयाच प्रचाराचे अड्डे होताना दिसत आहे. त्यामुळे जनताही या टीका टीपण्णीतून मनोरंजन करताना दिसत आहे. सद्यपरिस्थितीत तंत्रज्ञानातील क्रांतीचा लाभ …

Read More »

युपीएचं सरकार आल्यावर २००९ सालासारखी कर्जमाफी देवू उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खा. सुप्रिया सुळेंचे आश्वासन

बारामतीः प्रतिनिधी आमचं युपीएचं सरकार आल्यावर २००९ मध्ये जशी कर्जमाफी केली तशी या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिले. बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या सभेत …

Read More »

मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना उत्तर

कोल्हापूरः प्रतिनिधी पक्षावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांचे पुतणे अजित पवार यांनी हिट विकेट काढल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मोदी यांच्या गौप्यस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य करताना शरद पवार यांनी मोदींनी माझ्या कुटुंबियांची चिंता करू नये असा इशारा देत माझ्या आईचे माझ्यावर संस्कार असून माझी …

Read More »

पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी पुतण्याकडून शरद पवारांची हिट विकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र

वर्धाः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी सध्या कौटुंबिक लढाई सुरु असून शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवारांच्या हातून शरद पवार यांची हिट विकेट होणार असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने वर्धा येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदींकडून पवारसाहेब व राष्ट्रवादी टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी वर्धा येथील सभेत रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी पवारसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. शरद पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे मोदी विचारत आहेत. परंतु देशात आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले हे जगजाहीर आहे. मात्र …

Read More »