Tag Archives: ncp

अमोल मिटकरी यांची टीका, राज्यपाल भाजपाचे एजंट अन् संघाचे… त्यांना त्यांच्या राज्यात लवकरात लवकर पाठवा

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत रहात असतात. नुकतेच त्यांनी मुंबई, ठाणेतून राजस्थानी आणि गुजराती लोक बाजूला काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून कोणी म्हणणार नसल्याचे वक्तव्य केले. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून सर्वच राजकिय पक्षांनी टीकेचे आसूड ओढले. भाजपाने राज्यपाल कोश्यारी …

Read More »

अजित पवार यांची खोचक टीका, मुख्य सचिवांना अधिकार द्या अन् दोघेबी घरी बसा मग बाकीच्यांनी काय तुमच्या तोंडाकडे बघायचं का?

राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास सातत्याने उशीर होत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्र्यांना असलेले काही अधिकार विभागाच्या सचिवांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा …

Read More »

राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे राष्ट्रवादी नव्हे, राष्ट्रद्रोहीच ‘राष्ट्रवादी’च्या तिरंगाविरोधी भूमिकेवर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशातील जनता उत्सव साजरा करत असताना या उत्साहात मिठाचा खडा टाकणाऱ्यांचा राष्ट्रद्वेषच यानिमित्ताने देशासमोर आला आहे. ‘हर घर तिरंगा’ हा एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून देशातील कोट्यवधी लोकांच्या प्रतिसादामुळे हा राष्ट्रभक्तीचा उत्सव ठरला असताना देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास फालतूगिरी म्हणणाऱ्या प्रवृत्तींनी आपली राष्ट्रद्रोही मानसिकता उघड …

Read More »

संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवरून छगन भुजबळ म्हणाले, लवकर जामीन… नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या याची माहिती नाही

शिवसेनेतील आमदार, खासदारांच्या विरोधात ईडीकडून लक्ष्य करत कारवाई करण्यास सुरुवात केली. नुकतीच संजय राऊत यांची पत्रावाला चाळ प्रकरणी चौकशी करत मध्यरात्रीनंतर अटक केली. त्या पाठोपाठ संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठविल्याचे सांगितले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राऊत कुटुंबियांना सूचक इशारा दिला. संजय राऊत …

Read More »

राष्ट्रवादीचा आरोप, मोदी सरकारच्या धोरणामुळे चार महिन्यात १०० अब्ज डॉलरची तूट प्रवक्ते महेश तपासे यांचा आरोप सूचना मागविण्याची केली मागणी

मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आयात – निर्यातमधील वित्तीय तूट या चार महिन्यात १०० अब्ज डॉलर झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. एकीकडे वाढती महागाई, बेरोजगारी आणि बेरोजगारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटणारे मूल्य या सर्वांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही ना अशा …

Read More »

महेश तपासे यांचा आरोप, बेरोजगारीबाबतची मोदी सरकारची आश्वासने खोटी उज्वला योजनेतील लाभार्थ्यांनी पाच वर्षात एकदाही सिलेंडर नव्याने भरला नाही...

महागाई, बेरोजगारी आणि डॉलर या तीन गोष्टींनी मोदीसरकारच्या कार्यकाळात उच्चांक गाठला असल्याने तरुणवर्ग हवालदिल झाला आहे त्यामुळे बेरोजगारी बाबतची मोदींची आश्वासने खोटी ठरली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. ज्या उज्वला योजनेचा गवगवा मोदी सरकारने केला त्या योजनेतील ४.१३ कोटी लाभार्थ्यांनी गेल्या पाच वर्षात एकदाही …

Read More »

राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने भेट घेत दिले ‘हे’ निवेदन दिले २१ मागण्यांचे निवेदन

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज (२ ऑगस्ट रोजी) राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अदितीताई …

Read More »

अजित पवार यांचा हसत खोचक टोला, रिकाम्या खुर्च्याही या दोघांकडे… मंत्रिमंडळ विस्तारावरून लगावला टोला

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येवून एक महिना झाला. तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मात्र तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना टोला लगावला. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, …

Read More »

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्याचा प्रमुखच नियम तोडत असेल तर… शेतकऱ्यांना मात्र दुसरा प्राधान्यक्रम

विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला महत्व न देता मुख्यमंत्री स्वतःच्या सत्काराला प्रथम प्राधान्यक्रम देत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुसरा प्राधान्यक्रम देऊन त्याकडे दुर्लक्ष करत सत्कार घेण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत हा असंवेदनशीलतेचा कळस असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला. मुख्यमंत्री मिरवणूका, …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मागितली माफी राज्यपाल कोश्यारी यांनी क्षमा करण्याची राज्यातील जनतेला विनंती

दोनच दिवसांपूर्वी अंधेरी येथील रस्त्याचे नामकरण सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाणे येथून गुजराती-राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपा आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट वगळता सर्वच राजकिय पक्षांनी तीव्र शब्दात राज्यपालांच्या या वक्तव्याचा …

Read More »