Tag Archives: prakash ambedkar

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त टोलमाफ करा टोलमाफीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी देशभरातून नागपूरच्या दीक्षाभूमी येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान बौद्ध अनुयायांना टोलमाफी देण्याची मागणी केली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय पंतप्रधान मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी ठरले आहे. मोदी यांच्या स्वत:च्या इगोमुळे देशाचे आर्थिक, परराष्ट्र धोरण याला धक्का बसलाय. मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय. भारत जगभरातून जे ऑईल घेऊन इतर देशांना विकतोय त्याचा ८० टक्के नफा जवळपास ४४ हजार कोटींचा नफा (प्रॉफीट) हा फक्त अंबानीला होतोय. …

Read More »

मणिपूर हिंसाचारावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान मोदींना सात प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल

मणिपूरमधील सुरू असलेल्या हिंसाचारावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. मोदींनी मणिपूरला “भारताच्या मुकुटातील रत्न” असे संबोधले होते. या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी ते “क्रूर थट्टा” असल्याचे म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया …

Read More »

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणीः गृहसचिवांना प्रतिज्ञा पत्र दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश राज्याच्या गृहसचिवांना ३ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयाने राज्य शासनाला फटकारत राज्याच्या गृहसचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर न्यायालयाने चौकशी केल्यावर पुढे काय कारवाई करायची? याविषयी कायद्यात कोणतीही तरतूद नाहीये. त्यामुळे अशा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का? मनोज जरांगे पाटील यांना केला थेट सवाल

मराठा आरक्षणाचा विषय वाढत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. …

Read More »

न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी एसआयटीची स्थापन तपास पथकात परभणीतील कोणताही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही

परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना ८ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा केली आहे. या विशेष तपास पथकात …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे ८ दिवसांत एसआयटी स्थापनेचे आदेश ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा न्यायालयात युक्तिवाद, राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) एका आठवड्यात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे …

Read More »

निवडणूक हेराफेरीवर वंचित बहुजन आघाडीकडून शरद पवार यांना सवाल हेराफेरीची माहिती असूनही पोलिसात तक्रार का केली नाही

वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील हेराफेरी प्रकरणावरून थेट निशाणा साधला आहे. पक्षाच्या अधिकृत एक्स ‘X’ हँडलवरून शरद पवार यांना पाच थेट प्रश्न विचारले असून, या घडामोडीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही उल्लेख आहे. वंचित बहुजन आघाडीने विचारलेल्या मुद्द्यांनुसार, शरद पवार यांना दोन व्यक्तींनी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधी यांना आवाहन, महाराष्ट्रातील ७६ लाख मतवाढ याचिकेतही सहभागी व्हा महाराष्ट्रातील मते वाढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत इंटरव्हिनर म्हणून सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी ५ नंhdjतर झालेल्या ७६ लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सहभागी होवून मत मांडावे असे आवाहन केले. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, त्या पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अन्यथा… वर्दीचा गैरवापर करत महिलांना जातीवाचक शब्द वापरून अवमान

औरंगाबादहून पुण्यात आलेल्या महिलेला मदत केल्याच्या कारणावरून मदत करणाऱ्या महिलांच्या विरोधात पोलिस वर्दीचा गैरवापर करत पुण्यातील कोथरूडमधील पोलिसांनी वॉरंटशिवाय त्या महिलांच्या घरी जाऊन ताब्यात घेतलं आणि पोलिस ठाण्यात नेलं. तसेच त्यांची एफआयआरही नोंदवून घेतली नाही. अखेर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिस उपायुक्तांना फोन करून गुन्हा दाखल …

Read More »