Tag Archives: rain

बदलापूरात दिवाळी निमित्त लक्ष्मी पूजनात वरूणराजाने पाणी फेरले लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच पावसाने हजेरी लावल्याने उत्साहावर परिणाम

दिवाळी सणाचा आज तिसरा दिवस प्रथेप्रमाणे आज दिवाळीचे लक्ष्मीपूजनाचा दिवस त्यामुळे सकाळपासूनच नागरिक आणि व्यावसायिकांकडून लक्ष्मी पूजनाची तयारी सुरु केली. परंतु आकाशातील वरूण राजाने बदालापूरात अचानक हजेरी लावत नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले. पावसाच्या या अचानक आगमनामुळे नागरिकांनी त्यांच्या घरासमोर अंगणात काढलेल्या रांगोळ्या पुसल्या गेल्या, किल्ली व कंदील भिजले व फटाके …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली. अतिवृष्टीमुळे …

Read More »

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रु.च्या निधीस मान्यता नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय …

Read More »

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्यातील बांधावर जात केली बाधित क्षेत्राची पाहणी पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी मंजूर

“अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. राज्यात पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी शेतक-यांना मंजूर झाला आहे. मंजूर केलेला निधी पुढच्या आठवड्यापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात …

Read More »

अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग चा घेतला आढावा

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच राज्यातील पावसाने प्रभावित झालेल्या इतर भागातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

गिरीश महाजन यांचे आदेश, अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा

भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे आपत्ती व्यवस्थापन विभागात घेतला मुंबईतल्या स्थितीचाआढावा

गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले. मंत्री मंगलप्रभात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात अतिवृष्टी, ८०० गावे बाधित, मुंबईत १७० एमएम पाऊस मुख्यमंत्र्याचे सर्व यंत्रणांना सतकर्तचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान मंत्री गिरीश महाजन, मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय …

Read More »

शशिकांत शिंदे यांची मागणी, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची विशेष अधिवेशन घेण्याची मागणी

शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे बळीराजाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत जाहीर करावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, …

Read More »

या जिल्ह्यांसह घाट परिसरामध्ये २४ तासांचा ऑरेंज अलर्ट पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील २४ तासात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट  परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५-३० पासून रात्रौ ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे पर्यंत ३.५ ते ४.१ मीटर पर्यंतच्या उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न …

Read More »