Tag Archives: raj thackeray

शिंदेंना सावध शुभेच्छा, तर राज ठाकरे यांच्याकडून फडणवीसांचे पत्र पाठवत कौतुक वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून परताल…

शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे यांची काल अनपेक्षितपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना किमान तुम्ही तरी सावध पाऊल टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे …

Read More »

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी दिल्या ‘सावध’ शुभेच्छा किमान तुम्ही तरी सावध पावले टाका

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारच सावध शुभेच्छा दिल्या. तसेच किमान तुम्ही तरी सावध पावले टाका अशा शुभेच्छा ट्विट करत दिल्या. या ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी नेमके कोणापासून सावध रहा …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावरून राज ठाकरे म्हणाले, तर त्याचा ऱ्हासाकडे… ट्विट करत नाव न घेता केली टीका

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिध्द करण्याचे दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी काल …

Read More »

राज ठाकरे यांची प्रकृती स्थिर, लीलावतीत झाली शस्त्रक्रिया रविवारची शस्त्रक्रिया मंगळवारी

मागील महिन्यात पुण्यात आयोजित सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः जाहिर करत आपल्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे पुढील महिना दोन महिने भेट होणार नसल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया जवळपास दोन ते तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज अखेर राज ठाकरे यांच्यावरील हिप बोनवरील शस्त्रक्रिया …

Read More »

राज ठाकरे म्हणाले; कोणी येवू नका, मी कोणाला भेटणार नाही कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून ट्विट करत केले आवाहन

दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १४ जूनला वाढदिवस असला तरी मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोणालाही भेटणार नसून कोणी भेटण्यासाठी येऊ ही नये असे आवाहन करणारी एक ऑडिओ पोस्ट दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी आज ट्विट केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते …

Read More »

राज्यसभेसाठी मनसे कोणाला करणार मतदान? शेलार यांनी केला खुलासा आमदार राजू पाटील भाजपाला मतदान करण्याची शक्यता

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं असून सहाव्या जागेसाठी आपल्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळावीत यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मनसेचे मत मिळावे यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जाऊन भेट घेतली. …

Read More »

राज ठाकरे पत्र लिहित म्हणाले, हा विषय मला संपवायचाय भोंग्यावरून मनसैनिक आणि सर्वसामान्य जनतेला पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना नव्याने ट्वीट करीत आदेश दिला आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या भोंग्या विषयी त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. ते पत्र त्यांनी घरोघरी पोहोचवा असे सांगितले आहे. मनसेने मस्जिदीवरील भोंग्यांना हात घातल्यानंतर देशातल वातावरण चांगलच ढवळून निघालं आता हा विषय आपल्याला संपवायचा आहे. आपले विचार घरोघरी …

Read More »

राज ठाकरे यांच्या आरोपानंतर मनसे नेत्यांकडून “तो” फोटो व्हायरल, एक तेल लावलेला पैलवान तर दुसरा.. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून समाजमाध्यमांवर फोटो शेअर करत केला आरोप

अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागितली तर त्यांना उत्तर प्रदेशात प्रवेश देवू अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. त्याचबरोबर राज ठाकरें माफी मागता पोलिस काय लष्कर घेवून आले तरी त्यांना उत्तर प्रदेशात घुसू देणार …

Read More »

काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, अयोध्या द ट्रॅप चित्रपटाचा रचेता दुसरं-तिसरं कोणी… मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आरोपावर सचिन सावंतकडून दावा

उत्तर प्रदेशातून वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा तुर्तास स्थगित केल्याचे जाहिर करत याप्रश्नी सविस्तर बोलण्यासाठी पुण्यात आज जाहिर सभा घेतली. त्यावेळी अयोध्येत माझ्या विरोधात ट्रॅप लावण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या द ट्रॅप …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, कोणीतरी उठतो माफी मागा म्हणतो… राजकारण नीट समजून घ्या भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग याचे नाव न घेता प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न

अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवणार नसल्याचा इशारा दिला. त्यातच राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात आयोजित जाहिर सभेत आज ठाकरे म्हणाले की, पुण्यातल्या पत्रकार परिषदेत …

Read More »