Tag Archives: sharad pawar

मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची व समविचारी पक्षांची महाआघाडीबाबत चर्चा झाली आहे. शेवटची बैठक कॉग्रेसचे नेते खर्गे यांच्यासोबत होणार असून आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. राष्ट्रवादी …

Read More »

मोदीलाट ओसरल्याने पवारांसह अनेक मातब्बर निवडणूकीच्या रिंगणात?

शरद पवार, मुत्तेमवार, शिंदे, चव्हाण यांच्यासह अनेकांचा समावेश मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहीलेला असतानाच भाजपच्या मोदीलाटेच्या वाटवटळीतून आपले राजकीय जहाज वाचविलेल्या आणि बुडालेल्या अनेक नेत्यांनी आता पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे …

Read More »

शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये अन्यथा भाजप पराभव करणार

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा  मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीचे पडघड वाजण्यास सुरुवात झाली असून गतवेळी निवडणूक रिंगणातून संन्यास घेतलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी गळ घालण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार साहेबांनी या वयात लोकसभा लढाऊ नये, अन्यथा तो मतदारसंघ भाजपच्या वाटेल आल्यास भाजप त्यांचा …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि समविचारी आघाडीला निवडणूकीमध्ये चांगले यश मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांना आशावाद  मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकांची तयारी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये समाविष्ट व्हावेत यादृष्टीने आमची चर्चा सुरु आहे. आम्हाला खात्री आहे की, येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रामध्ये …

Read More »

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणाऱ्या पथकाला विदर्भात न जाण्याचे आदेश राष्ट्र्वादी काँग्रेसचे शरद पवार यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकाने फक्त मराठवाड्यात पाहणी केली. या चमूला विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने केल्या. त्यामुळे हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत राज्याचं नेतृत्त्व विदर्भाकडे असल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही …

Read More »

शासन साखर उत्पादकांची पाठिशी एफआरपी देण्यात महाराष्ट्र अव्वल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

पुणे : प्रतिनिधी साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ऊसाच्या हार्व्हेस्टरसाठी राज्य शासनाने ४० लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी …

Read More »

शरद पवार म्हणतात भाजपला पर्याय काँग्रेसच निवडणूका होतील त्यावेळी देशातील चित्र बदलणार असल्याचे भाकित

मुंबई : प्रतिनिधी काल चार राज्यांचा लागलेला निकाल पाहता लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कालचे जे निकाल आले आहेत. त्याबद्दल भाजप सोडून इतर पक्षांमध्ये समाधान आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा पर्याय महत्वाचा पक्ष असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. हा चार राज्याचा प्रश्न नाही तर …

Read More »

शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करू नका कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे लोकनेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना दयावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस …

Read More »

दुष्काळाचे गांर्भिय लक्षात घेवून तात्काळ निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्या शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांर्भिय लक्षात घेवून राज्यसरकारने निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पाऊले उचलून जनतेला दिलासा दयावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असून त्यासोबत दुष्काळी संकटाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही पाठवली आहे. महाराष्ट्राच्या …

Read More »

सामाजिक वातावरण खराब करणाऱ्या शक्तीच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आदेश

मुंबईः प्रतिनिधी जाती-जातीमध्ये…धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि गावागावात चुकीचे संदेश पोचवण्याचे काम केले जात असल्यामुळे देशात आज खराब आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे…या शक्तीच्याविरोधात सामना करण्यासाठी तयार होतानाच आपल्याला नेहरु,मौलाना आजाद,आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मौलाना …

Read More »