मुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी कारवाई करत त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले. मुंबई बाहेरुन आल्यामुळे सरनाईक यांनी स्वःताला क्वारंटाईन करून घेतले. दरम्यान, आपण …
Read More »संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांचे प्रति आव्हान ईडीला भाजपा नेत्यांची नावे द्याच
मुंबईः प्रतिनिधी शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या १२० नेत्यांच्या नावाची यादी आपण देणार असल्याचे जाहीर करत भाजपाला आव्हान दिले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आव्हानाची तात्काळ दखल घेत राऊतांनी जाहीर केल्याप्रमाणे नावे द्यावीच असे प्रतिआव्हान देत शिवसेनेवर पलटवार केला. ते …
Read More »शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात आघाडीतील सहयोगी पक्षांकडून भाजपावर टीकेचा सूर
मुंबईः प्रतिनिधी आर्किटेक्चर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सातत्याने आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाडी टाकत सरनाईक यांचे सुपुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. नाईक प्रकरणात सरनाईक यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे या प्रकरणाची बंद झालेली फाईल राज्य सरकारने पुन्हा उघडली. तसेच पुढील …
Read More »गरीबीमुळे शिक्षण सोडाव्या लागलेल्या मंत्र्याने अखेर पदवी मिळवलीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा अनोखा आदर्श
मुंबई : प्रतिनिधी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून स्वत:बरोबर घरच्यांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी नोकरी धरली. मात्र कालापरत्वे या विपरीत परिस्थितीवर मात करत सधनता मिळविल्यानंतरही आणि व्यस्त राजकिय जीवनातही आपले शिक्षण पूर्ण करून पदवी मिळणारे थोडेच असतात. या थोड्यांमध्ये आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश झाला असून त्यांनी नुकतीच …
Read More »स्वतंत्र भारतातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या लढ्याला महाविकास आघाडीकडून सोबतीचे आश्वासन महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांचे सीमाभागातल्या बांधवाना पत्र
मुंबई : प्रतिनिधी भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेल्याने १ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी सीमाभागातल्या जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ …
Read More »भावी १२ आमदारांच्या नावावर मंत्रिमंडळाचे एकमत…पण नावे लखोट्यात बंद! नावांबाबत कमालीची गुप्तता
मुंबई : प्रतिनिधी गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावाच्या प्रस्तावाला अखेर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येकी ४ नावांबाबत तिन्ही पक्षांत अखेर एकमत होऊन सदर १२ नावांची यादी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. आज पार पडलेल्या …
Read More »शिवसेना पक्षप्रमुख ठाकरें म्हणाले, आमचं हिंदूत्व थाळ्या-घंटा बडविणारे नाही भाजपाने आमचं सरकार पाडण्याआधी स्वत:च सरकार साभांळावे
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचं संकट आहे. पण मंदीर उघडत नसल्याने काहीजण मला माझं हिंदूत्व विचारत असून ते म्हणतात मी सेक्युलर झाला की काय? असा प्रश्न विचारत आहेत. आम्हाला कोणाकडून हिंदूत्व शिकण्याची गरज नसून आमचं हिंदूत्व हे थाळ्या-घंटा बडविणार नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या प्रमाणे अतिरेक्यांना मारणारं हिंदूत्व …
Read More »खडसेंची भविष्यवाणी आणि भाजपा समर्थक विद्यमान आमदार शिवसेनेत मिरा-भांईदरमधील माजी आमदार मेहताच्या त्रासाला कंटाळून
मुंबई : प्रतिनिधी भाजपामधील अंतर्गत असंतोष एकनाथ खडसे यांच्यानिमित्ताने बाहेर उफाळून आल्यानंतर त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ आता मीरा-भाईंदरच्या विद्यमान आमदार तथा मुळच्या भाजपाच्या मात्र आता समर्थक असलेल्या गीता जैन यांनीही भाजपाची साथ सोडत थेट शिवसेनेत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राज्यात भाजपा पक्ष संघटनेचा …
Read More »ड्रिम प्रोजेक्ट जलयुक्त शिवारच्या SIT चौकशी आदेशाने फडणवीस अडचणीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार ही योजना राबविण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतची आणि त्याच्या ठेक्याची कामे भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना-कार्यकर्त्यांना मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत होत्या. यासंदर्भात नुकत्याच सादर झालेल्या कॅगच्या अहवालातही …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ते ट्विट आणि फडणवीस-राऊत यांची भेट पू्र्व नियोजित भेट असल्याचा दोघांकडून खुलासा
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कसे कुचकामी आहे ? हे सिध्द करण्यासाठी भाजपाकडून जंगजंग पछाडले जात असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची काल भेट झाली. मात्र ही भेट गुप्त नव्हे तर सामनासाठी द्यायच्या मुलाखतीसाठी अटी निश्चित करण्यसााठी असल्याचा खुलासा …
Read More »
Marathi e-Batmya